Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

मा शरद पवार यांच्या उपस्थितीत 17 व्या भीमथडीचा समारोप- 18 व्या भिमथडीच्या तारखा जाहीर

पुणे :- महिला बचत गटांना आर्थिक सक्षम करणारी भीमथडी जत्रेची यशस्वी 17 वर्ष पाहता भीमथडी मधून हजारो महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्या असून अनेक महिला स्वतःच्या व्यवसायातून इतर महिलांच्या हाताला काम देत आहेत.भीमथडीच्या यशात सुनंदाताई पवार आणि त्यांच्या सर्व टीमचे योगदान पाहता हे काम इतर प्रदर्शनासाठी मोलाचे मार्गदर्शक ठरणारे आहे असे मत मा.शरदचंद्र पवार यांनी अभिनंदन व्यक्त केले.

या भीमथडी जत्रेला राज्यातून वेगवेगळ्या कलाकारांनी आपली कला सादर केली.यावेळी मा.शरद पवार साहेबांनी अनेक महिला बचत गटातील महिलांशी संवाद साधून महिलांशी व्यावसायिक चर्चा करून सर्व महिला बचत गटांच्या स्टॉल ला भेट दिली. यावेळी महाविद्यालयातील मुलांनी स्टार्टअप बाबत तसेच आदिवासी व सहभागी बचत गटातील महिलांनी पवार साहेबांशी मनमुराद चर्चा केली. या भीमथडी जत्रेत 11 राज्य , 21 जिल्हे, 321 महिला बचत गटांनी भीमथडी जत्रेत सहभाग घेतला आहे. या दरम्यान सहभागी महिला बचत गटांची 5 दिवसात 4 कोटीं 60 लाखापेक्षा जास्त आर्थिक उलाढाल झाली आहे. लाखो ग्राहकांनी या जत्रेला भेट दिली आहे.
यावेळी मा.खा. सुप्रियाताई सुळे, आमदार रोहित पवार, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा.डॉ पी.जी.पाटील,
आयोजक सुनंदाताई पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे यांच्यासह मोठ्या संख्येने पुणेकर उपस्थित होते.
दरम्यान दिनांक 20 ते 25 डिसेंबर 2024 च्या या कालावधीत पुढील 18 वि भीमथडी भरणार असल्याचे आयोजकांतर्फे जाहीर करण्यात आले आहे.

Spread the love