Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

कॅटलिस्ट फाउंडेशन मार्फत कोरेगाव भीमा येथे स्वच्छता मोहीम

पुणे ता.२. (प्रतीनिधी) : एक जानेवारीच्या अभिवादन कार्यक्रमानंतर येथे मोठ्या प्रमाणावर साठलेला कचरा स्वच्छ करण्यासाठी प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही कॅटलिस्ट फाउंडेशन मार्फत भीमा कोरेगाव येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने यांच्या सह मा.उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, रोहित भिसे, सिद्धांत जगताप, संतोष भिसे, नितीन गायकवाड (एच.एम), शाम भालेराव, राजाराम भिंगारे, अनिल माने, नितीन काळूराम गायकवाड, प्रतिक वाघमारे, बीबीसी चे अध्यक्ष प्रा. श्याम वाकोडे उपाध्यक्ष प्रशांत तुळवे, सचिव संतोष येवले, निलेश नितनवरे,धम्मदीप गवारगुरु यांच्यासह बुद्धिस्ट बिजनेस कम्युनिटी असोसिएशन महाराष्ट्रच्या सदस्यांनीही यामध्ये सहभाग नोंदवला.

यावेळी सुनील माने म्हणाले, १ जानेवारीला शौर्यदिनानिमित्त भीमा कोरगाव येथे लाखो अनुयायी भीमा कोरेगाव येथे झालेल्या ऐतिहासिक लढाईत पराक्रम गाजविणाऱ्या सर्व शूरवीरांच्या शौर्याला वंदन आणि या लढाईत धारातीर्थी पडलेल्या वीरांना अभिवादन करण्यासाठी येत असतात.

यामुळे दुसऱ्या दिवशी येथे पुष्पहार, फुले, पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिक कागद, खाद्यपदार्थांची रिकामी पाकिटे असा कचरा मोठ्या प्रमाणावर जमा होतो. दुसऱ्या दिवशी हा कचरा साफ करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी व प्रशासनावर मोठा ताण पडतो. त्यामुळे सामाजिक जबाबदारी म्हणून हा कचरा साफ करण्यासाठी आम्ही प्रतिवर्षी दोन जानेवारीला स्वच्छता मोहीम राबवतो. याप्रमाणे या वर्षीही कार्यकर्त्यांसह ही स्वच्छता मोहीम राबवली.

Spread the love