Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

कै.विठ्ठलराव शिवरकर यांचा 39 वा स्मृतीदिन संपन्न

पुणे : माजी आमदार स्वर्गीय विठ्ठलराव शिवरकर यांच्या 39 व्या स्मृतिदिनानिमित्त विठ्ठलराव शिवरकर उद्यान, वानवडी, पुणे येथे अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिनजी साठे (सामाजिक कार्यकर्ते), कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक ह.भ.प.डॉ.पंकज महाराज गावडे, बाळासाहेब शिवरकर (माजी राज्यमंत्री), आमदार चेतन दादा तुपे, माजी महापौर प्रशांत दादा जगताप, बापूसाहेब गानला, चंद्रकांत ससाणे सर, ॲड.अर्जुनराव खुर्पे, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विठ्ठलराव शिवरकर उद्यानातील कै. विठ्ठलराव शिवरकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन साठे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात कै.विठ्ठलराव शिवरकरांनी परिसराचा विकास करीत असतानाच संस्कारही विकसित केल्याचे सांगितले. तसेच ह.भ.प. डॉ.पंकज महाराज गावडे यांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता सर्वांनाच असल्याचे सांगून त्यांच्या कार्याचा परिचय करून दिला.

कार्यक्रमाचे मार्गदर्शक ह.भ.प. डॉ.पंकज महाराज गावडे यांनी आपल्या मार्गदर्शनात तळपणारा सूर्य जसे अनेक जीवांना अन्न जीवन देतो, तसे महान कार्य, जीवन जगतानाची निष्ठा, चरित्रांची शुद्धता असलेले कै. विठ्ठलराव शिवरकर होते, असे त्यांनी सांगितले. आज त्यांची पुण्यतिथी साजरी करण्याच्या प्रेरणेतून ‘असेच कोणी भविष्यात निर्माण होतील व पुन्हा वानवडीचा विकास होईल’, असा विश्वास व्यक्त केला.

विचारांची सखोलता व त्यातून जन्माला येणारे पीक समाजाला देणारे हे कै.विठ्ठलराव शिवरकर होते. घराबाहेर पडताना हे लक्षात घ्या की, आपल्या आई-वडिलांना दुःखाचे अश्रू देऊ नका, त्यांना अपमानित व्हावे लागेल असे वागू नका, असे किशोरवयींना सांगितले. भविष्यात ज्ञान आणि चारित्र्य असेल तर जगाची द्वारे तुम्हाला खुली असतील. आत्म्याचे सौंदर्य हे सर्वात मोठे आहे. मनातील कचरा साफ होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी मार्क्सवंत न होता, गुणवंत होणे आवश्यक आहे. शरीरावर काम करा, शरीर मजबूत ठेवा, मन मजबूत ठेवा, असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. कारण जीवन जगण्यासाठी व जगवण्यासाठी आहे. शिवाजी महाराजांना समजून घेणे म्हणजे खरे कृतीयुक्त जीवन आहे. जीवनाचे ध्येय निश्चित करा, उद्दिष्ट निश्चित करा, व्यवसाय निर्माण करा, असे सांगितले. ध्यानधारणा, योग साधना व नियमित वाचन करा असे सांगितले. सोशल मीडियापासून दूर राहण्याचा सल्लाही त्यांनी मुलांना दिला. “चला राष्ट्र बनवूया” या उपक्रमाची कल्पना सांगितली. जेष्ठांनी लायब्ररी जॉईन करा, सर्वांशी प्रेमाने वागा, माणसं वाचणं हे ज्येष्ठच करू शकतात, त्यामुळे तुमच्या अनुभवाचा उपयोग त्यांच्यासाठी करा. अंतरंगातील निरागसता जगाला अनुभव द्या, असे आवाहन केले.
याप्रसंगी आमदार चेतन तुपे यांनी आपल्या भाषणातून शिवरकर परिवाराचे नाते माणुसकीचे नाते आहे, असे सांगितले. कै.विठ्ठलराव शिवरकरांनी पारतंत्र्याचा, स्वातंत्र्याचा व वेगाने होणारा वानवडीचा विकासही पाहिला. 57 ते 62 हा राजकीय कालखंड हा वानवडीचा सुवर्णकाळ होता, असेही सांगितले.
माजी महापौर प्रशांत दादा जगताप यांनी आपल्या भाषणातून कै. विठ्ठलराव शिवरकरांच्या कार्याचा आढावा घेतला व त्यांच्या स्मृती जतन होतील, असे कार्य करू असे सांगितले.

याप्रसंगी माझी नगरसेविका कविताताई शिवरकर, तसेच मायाताई ससाणे, सोनाली परदेशी, डॉ. गौरी शिवरकर,दीपा जांभूळकर, संपदा शिंदे, श्रद्धा ससाणे, पल्लवी कोद्रे, रेश्मा हिंगणे, सविता गिरमे, प्रभाकर तात्या शेवाळे, अमित घुले, शंकर तुपे, दीपक केदारी, संजय लोणकर, दिलीप टकले, प्रशांत जाधव, जयसिंग गोंधळे, प्रशांत मामा तुपे, संजय शेवाळे, नगरसेवक आबा तुपे, गणेश फुलारे, दिनेश गिरमे, विशाल हक्के, संभाजी हक्के, विजय कोद्रे, अमित घुले, सिद्धार्थ परदेशी, सिद्धांत परदेशी, विजय जाधव, ॲड.मधुसूदन मगर, योगेश गोंधळे, जीवन बापू जाधव, अनिल कामठे सर, दशरथ जाधव, रेवा अहिर, संतोष शिंदे, हेमंत रायकर, गणेश शिवरकर, श्रीकांत काबा, विठ्ठलराव शिवरकर विद्यालयाचे प्राचार्य लहू वाघुले सर, वानवडी ग्रामस्थ, शिक्षकवृंद, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेवक अभिजीत शिवरकर यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लहू वाघुले सर यांनी केले.

Spread the love