Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

लेखिका करिश्मा कृष्ण कुमार यांनी लिहिलेल्या ‘लँडेड २१:१२’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच पुण्यात संपन्न झाले

लँडेड २१. १२ पुस्तक पुण्यात प्रकाशित किशोरवयीन तरूण आणि पालकांनी वाचावे असे पुस्तक पुणे, ६ ऑगस्ट २०२२: नव्या पिढीतील लेखिका करिश्मा कृष्ण कुमार यांनी लिहिलेल्या ‘लँडेड २१:१२’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच पुण्यात संपन्न झाले.

हे पुस्तक भारतात अॅमेझॉनवर आणि यूएस, युरोप, कॅनडा आणि जगभरातील अनेक देशांमध्ये उपलब्ध आहे. लँडेड २१. १२ ही करिश्मा कृष्ण कुमार यांची पहिली कादंबरी आहे. हे पुस्तक अशा पाच तरुणांबद्दल आहे जे जगभरातून पुण्यात आपले महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी येतात.

त्यांच्यावर कश्या प्रकारे संकटे येतात व ते या संकटांना आणि परीक्षेला ते कसे तोंड देतात , याचबरोबर त्यांचे पालक देखील या सगळ्याला कसे सामोरे जातात याचे सविस्तर वर्णन पुस्तकात वाचावयास मिळते. ही कथा पुण्यावर आधारित आहे. हे किशोयवयीन तरुण सुरवातीच्या काळात मानसिक आव्हानांचा सामना कसे करतात.

त्यांच्या निर्णयांमुळे त्यांना कोणत्या दुखद स्थितीचा सामना करावा लागतो आणि त्याचे काय परिणाम होतात याचे तपशीलवार वर्णन पुस्तकात दिसुन येते. लॅंडेड २१.१२ हे पुस्तक केवळ किशोरवयीन मुलांनीच नव्हे तर पालक, शिक्षक आणि शैक्षणिक परिसंस्थेतील सर्वांनी देखील वाचले पाहिजे. या पुस्तकाला विदेशातील मेनस्ट्रीम प्रेस आणि सेलिब्रीटीज कडुन यापूर्वी प्रशंसा मिळाली आहे.

आत्महत्या, व्यसन, मानसिक आघात, विश्वासघात, मैत्री, विश्वास आणि अतूट बंध या पुस्तकाचा गाभा आहे. हे पुस्तक महाविद्यालयातील या तरुणांच्या भावना, प्रवास आणि अनुभवांचे वर्णन करते . कश्या प्रकार अनपेक्षित कारणांमुळे हे तरुण समजुतदार व जबाबदार होतात आणि त्यांच्या अपेक्षा किवां नियोजनाच्या विपरीत जीवनाने त्यांच्यासमोर काय मांडून ठेवले होते या सर्व गोंंष्टींचे सविस्तर वर्णन या पुस्तकात वाचता येईल.

कथा ५ मुख्य पात्र आणि त्यांच्या पालकांभोवती फिरते, जी त्यांच्या आपसी संबंधांबद्दल आहे. तरुण जसे जसे मोठे होत जातात त्याचप्रमाणे त्यांच्या वेगाने वाढणार्या इच्छा, बाकीच्यांसोबत राहण्यासाठी त्यांच्यावर आलेला दबाव, त्यांचा पालकांचा तणाव यातुन दिसून येते की विद्यार्थी आणि त्यांचे पालक दोघेही वेगवेगळ्या ट्रॅकवर शर्यतीत धावत आहेत.

बहुतेक लोक मानसिक आजारांकडे कश्याप्रकार दुर्लक्ष करतात व त्यांच्याकडे तरुणांशी कसे वागण्याचे याची समज नसते हे या पुस्तकाने ठळकपणे मांडले आहे. हे पुस्तक उपाय सुचवत नाही परंतु तरुणांच्या जीवनात येणारे गंभीर तणाव आणि आघात कमी करण्यासाठी प्रत्येकाची भूमिका कशी असते यावर वाचकाचे लक्ष वेधुन घेते.

Spread the love