Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक व घोडगंगा सहकारी साखर कारखाना वार्षिक सर्वसाधारण सभा

राज्यातील साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक, वेळेवर ऊसतोड न करणे, एफआरपीनुसार शेतकऱ्यांना भाव न देणे, वजनकाट्यात होणारी फसवणूक, सहकारी साखर कारखान्यांना कर्जबारी करून खासगी कारखान्यांना नफा देणे यासह घोडगंगा सहकारी साखर कारखाना वार्षिक सर्वसाधारण सभा, येथील भ्रष्टाचार, कारखाना डबघाईला का आला, कर्जबाजारी का झाला, या संदर्भात पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे.

ही पत्रकार परिषद मंगळवार, दि. २७ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी १२.३० वाजता हॉटेल श्रेयस, आपटे रस्ता, पुणे येथे होणार आहे. ऍड. सुरेश पलांडे, सुधीर फराटे, दादा पाटील फराटे, काकासाहेब खळदकर, पांडुरंग थोरात आदी पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.

तरी या पत्रकार परिषदेच्या वार्तांकनासाठी आपल्या लोकप्रिय दैनिकाचा, वृत्तवाहिनीचा प्रतिनिधी, कॅमेरामन पाठवावा, ही विनंती.

Spread the love