Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

आम्ही जातो आमच्या गावा,आमचा राम राम घ्यावा,
असं म्हणत असेल आमचा राहुल

आमच्या गावां,अरे भावा, का सोडून गेलास तू आमच्या गांवा,अन् जिवलग मित्र परिवाराच्या देवा, आंबा लागला होता मोहरू। कसं आता दुःखी मनाला सावरू।
याचंसाठी केला होता का, अट्टहास, शेवटचा दिस कडू व्हावा,,,,,,,,,,, तुकोबांची अमृतवाणी, ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी, शिवरायांची पावनभूमी, राहुल तुझ्या, सोज्वळ मैत्रीची आठवण कायम राहणार मणी

आई, वडील, बहिण भाऊ, नातेवाईक, मित्र परिवारास आठवणींचा चटका लावून, राहुल झाला अनंतात विलिन

कर्तुत्वाचा, नेतृत्वाचा, धातृत्वाचा ,अभिमानाचा,प्रेमळ मैत्रीचा, मायाळू, दयाळू, अन् माणुसकीचा झरा म्हणजे ‘राहुल अनंतराव हुलवळे’

वडील अनंतराव विठोबा हुलवळे,आई सुशीला यांच्या पोटी जन्मलेला जांभळे गावचा हिरे,मोती,माणिक यांच्या माळेतील मनी 3 ऑगस्ट 1977 रोजी जन्मलेला अवघ्या 45 वर्षाचा मैत्रीचा राजा,महाराष्ट्राचा मंगल कलश आणणाऱ्या, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मदिवशी ( १२ मार्च २०२३) ला अनंतात विलीन झाला.

आई वडील निवृत्त शिक्षक काका डॉक्टर, बहीण डॉक्टर, प्रचंड मोठे, आर्थिक सक्षम कुटुंब, मैत्रीचा पसारा, माणुसकीचा झरा, जोपासणारा राहुल गेल्याचे,,,,,,, कळल्यावर आम्हाला तर धक्काच बसला

जांभळे – ओतूर – पुणे- ओतुर असा राहुलचा प्रवास अतिशय प्रगतीचा, कर्तृत्वाचा,अभिमानाचा ठरला, डॉक्टर साहेबांनी घेतलेली पहिली बुलेट माझ्या लहानपणी राहुलल लहान असून देखील चालवताना पाहून अभिमान वाटायचा

खरे तर राहुलचे मोठे बंधू डॉक्टर,बहीण डॉक्टर, मोठा आर्थिक संपन्न परिवार, परंतु नियतीच्या अन् परमेश्वराच्या पुढे माणसाचे देखील काही चालत नाही,हेच यातून पहावयास मिळते

———- शोकाकुल ——-

राहुलच्या पाठीमागे कै.बबन विठोबा हुलवळे, अनंतराव विठोबा हुलवळे,
पोपट विठोबा हुलवळे,
कै.सखुबाई रामजी तांबे,
कै.भिकुबाई रेवजी गवांदे सौ.मुगाबाई रामभाऊ आरोटे
व चि. यशवर्धन,
वडील अनंतराव विठोबा हुलवळे,
आई सुशीला,
बहिण डॉ.अनिता श्रीधर गागरे,
डॉक्टर अस्मिता प्रवीण शिंदे, डॉ.कल्पना मनोहर डुंबरे, सौ.कल्याणी धनंजय कदम,
मोठे बंधू डॉक्टर ज्ञानदेव बबन हुलवळे,
बंधू अरुणशेठ पोपट हुलवळे,
अतुल पोपट हुलवळे,
असा मोठा परिवार असून,स्वर्गीय बबन विठोबा हुलवळे हे गावामध्ये पंजाब मधून जर्सी गाई आणून शेतकऱ्यांच्या दारामध्ये दूधगंगा निर्माण करणारे पहिले सरपंच होत

Spread the love