Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

वाघा बॉर्डर – दिल्ली – उज्जैन – इंदोर 1300 किमी सायकल यात्रा

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षनिमित्ताने आयोजित एचआयव्ही एड्स तथा पर्यावरण जनजागृती हेतू

डॉ पवन चांडक व पाटणकर करणार 5 राज्यातून सायकलप्रवास

भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त म्हणजेच देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वाघा बॉर्डर-दिल्ली-इंदोर असा 11 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर या कालावधीत परभणी येथील डॉ पवन सत्यनारायण चांडक व प्रा पांडुरंग पाटणकर हे एड्स आणि पर्यावरण विषयक जनजागृतीसाठी सायकल प्रवास करणार आहेत.

परभणी व महाराष्ट्रात होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) संस्था एचआयव्ही ग्रस्त अनाथ बालकांचे व निराधार महिलांच्या मूलभूत प्रश्न जसे शिक्षण, आरोग्य व पुनर्वसन तसेच 18 वर्ष पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी 2008 पासून लोकसहभागातून प्रयत्न करत आहे.

75000 किमी सायकल प्रवास पूर्ण: आजवर डॉ पवन चांडक यानी 75000 किमी सायकल प्रवासातून एड्स व पर्यावरण जनजागृती तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ याविषयी भारतातील 7 राज्ये व परदेशात 4 विविध देशात जसे जर्मनी, फ्रांस, ब्रिटन व स्कॉटलंड येथे जनजागृती केली आहे.

सेल्फ सपोर्ट/काटकसरीने प्रवास: कोणतीही बँक अप वाहन न घेता, हॉटेल लॉज चा मुक्काम टाळत गुरुद्वारा, मंदिर, धर्मशाळा, शासकीय विश्रामगृह आदी ठिकाणी मुक्काम करत सामाजिक संस्था, शाळांना भेट देत सायकलवर प्रवास करणार आहेत.

5 राज्यातून जनजागृती: पंजाब, हरयाणा, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश या 5 राज्यातून करणार सायकल प्रवास करणार आहेत.

10 नोव्हेंबर रोजी रेल्वेने अमृतसर साठी रवाना होतील.

12 नोव्हेंबर रोजी सुवर्ण मंदिर अमृतसर चे दर्शन घेऊन- वाघा बॉर्डर हुन सायकल यात्रेस सुरवात होईल.

पुढे जालंधर, लुधियाना, अंबाला, कर्नाल, पानिपत, दिल्ली मार्गे जयपूर, टोंक, बुंदी, कोटा, उज्जैन मार्गे इंदोर येथे सायकल यात्रा समाप्त करतील. परतीचा प्रवास दि 21 रोजी इंदोर हुन रेल्वे ने करणार आहेत.

या सायकल मोहिमेसाठी सचखंड गुरुद्वारा बोर्ड नांदेड, श्री महेश वडदकर उपजिल्हाधिकारी परभणी, पेस सायकलिंग ग्रुप परभणी, प्रा शिवा आयथळ, प्रा जयंत देशपांडे, संजय बियाणी नांदेड, डॉ रानु, डॉ धवन व सर्व सायकल प्रेमी व पर्यावरण प्रेमी मित्रांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

जाहिरात / प्रसिद्धिसाठी
संपर्क: शिवाजी मा. हुलवळे
संपादक: छत्रपती मिडीया ग्रुप ✒️
पत्रकार – छायाचित्रकार
9422306342 / 8087990343

Spread the love