Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

पालकांनो, मुलांशी चर्चा करा पण करिअर त्यांना निवडू द्या विवेक वेलणकर यांचे आवाहन

पुणे : आपल्याकडे मुलांनी कोणते करिअर निवडावे हे पालक ठवतात आणि त्याचा निकष असतो त्यांना परीक्षेत मिळालेले गुण. मात्र केवळ गुणांच्या आधारे अभ्यास शाखा आणि करिअर निवडणे धोक्याचे ठरते. यामुळे पालकांनो , मुलांशी चर्चा करा पण करिअर त्यांना निवडू द्या असे आवाहन करिअर मार्गदर्शक विवेक वेलणकर यांनी रविवारी केले. 

शिवसह्याद्री चॅरिटेबल फाउंडेशन, पुणे व शिवसह्याद्री युथ डेव्हलपमेंट सेंटर, पुणे संस्थेतर्फे इयत्ता 10 वी व 12 वी नंतर काय या विषयावर करियर गाईडननस मेळावा आज शंकरराव मोरे विध्यालय , न्यू लॉ कॉलेजचे सभागृह, पौड रस्ता येथे पार पडला, यावेळी  विवेक वेलणकर बोलत होते. याप्रसंगी शिवसह्याद्री चॅरिटेबल फाउंडेशनचे राजेंद्र कोंढरे, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता हेमंत धुमाळ, काकडे असोशीएट्सचे सूर्यकांत काकडे आदि उपस्थित होते. विद्यार्थ्यांना विवेक वेलणकर यांच्यासह     अनिल गुंजाळ, भगवान पांडेकर, प्रा विजय मराठे, व निवृत्त पोलिस अधिकारी भानुप्रताप बर्गे यांनी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन केले. 

पुढे बोलताना विवेक वेलणकर म्हणाले, दहावी, बारावी नंतर काय या प्रश्नाचे उत्तर गुण किती मिळाले, किंवा मित्र – मैत्रीण काय करणार आहेत आणि पालकांची इच्छा यावर ठरते, पण मुलांना कोणत्या शाखेत जायचे आहे? काय व्हायचे आहे याचा विचार पालक करत नाहीत यामुळे अनेकदा मुलांनी काही वर्षे वाया गेली किंवा निवडलेल्या शाखेत फार प्रगती झालेली नाही असे दिसते यामुळे पालकांनी मुलांशी करिअर बद्दल चर्चा करावी मात्र आपले निर्णय त्यांच्यावर लादू  नयेत, त्यांना जे आवडते आणि झेपते ते निवडू द्या असे आवाहन  वेलणकर यांनी केले. 

अनिल गुंजाळ म्हणाले,  आपल्याकडे करिअर ची निवड गुणांच्या आधारे करण्यापूर्वी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी निकाल नेमकेपणाने समजून घेतला पाहिजे. गुण किती मिळाले यापेक्षा कसे मिळाले हे पहाणे महत्वाचे असते. करिअरच्या संधी भरपूर आहेत यामुळे आपल्याला काय करायचे आणि कसे जगायचे याचा निट विचार करून करिअर निवडण्याचा विचार करावा.  अपयश आले तर खचून जाऊ नका, तसेच जे निवडाळे त्यामध्ये प्रचंड कष्ट करण्याची तयारी ठेवा. 

भानुप्रातप बर्गे म्हणाले, आपल्याकडे मुले आणि पालकांमधील संवाद हरवत चालला आहे, तो वाढवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. पैसा हा सर्वस्व नाही, आपल्याकडे चरित्र सोडून सर्व गोष्टीला अलीकडे प्रतिष्ठा मिळत आहे. यामुळे 9 वी ते 12 ची मुले भरकटण्याचाही धोका वाढला यासाठी पालकांचा मुलांशी उत्तम संवाद असणे महत्वाचे आहे. 

भगवान पांडेकर यांनी विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती बद्दल मार्गदर्शन केले तर प्रा विजय मराठे यांनी 11 वी ची ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र कोंढरे यांनी केले.

Spread the love