Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

विठ्ठलराव शिवरकर विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न

हडपसर, पुणे : विठ्ठलराव शिवरकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न झाला. विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक गोरक्षनाथ केंदळे सर यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

याप्रसंगी श्रद्धा सपकाळ, मंजुषा शिंदे साक्षी अडसूळ, पायल थोरात, गौरी गवळी, सलोनी जैस्वाल यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्या विषयी भाषणे केली. तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यावर आधारित गीताचे सादरीकरण करण्यात आले तसेच लोकमान्य टिळक यांच्या आठवणींना पूर्वा धनवे या विद्यार्थिनीने उजाळा दिला.

विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका वहिदा अवटी मॅडम यांनी आपल्या मनोगतातून लोकमान्य टिळकांचा स्वभाव गुणांचे वर्णन केले व त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाची माहिती दिली तसेच व्यायामाचे महत्त्व याबाबतची ही माहिती दिली ,तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी समायोजित विचार व्यक्त केले.

याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य लहू वाघुले सर तसेच गोरक्षनाथ केंदळे,मच्छिंद्र रकटे, अरविंद शेंडगे, घनश्याम पाटील, युवराज देशमुख, वहिदा अवटी,श्रद्धा ससाणे, दीपा व्यवहारे, आशा भोसले, दीपाली जाधव, उज्वला पगारे, संगीता भुजबळ, नलिनी गायकवाड, कल्पना पैठणे आदी शिक्षकवृंद तसेच कैलास वाडकर विवेक कांबळे लोखंडे नानी कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील शिक्षिका वहिदा अवटी मॅडम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले

Spread the love