Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

विठ्ठल मंदिर परिसर स्वच्छता विकास समिती ची वारजे नाका येथे पुण्यात प्रथमच स्थापना !

दिनांक १८ डिसेंबर २०२१ ला दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर पुण्यातील वारजे नाका प्रभागात चैतन्यनगरी समोरील विठ्ठल मंदिरात पहिली नागरिकांची परिसर विकास समिती स्थापना श्री. लक्ष्मीकांतजी देशमुख ( माजी आयुक्त अकोला व सुप्रसिद्ध साहित्य संमेलन अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, बडोदा ) यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी त्यांच्या भावपूर्ण सत्कार समारंभाचे ही आयोजन केले.

सत्काराला श्री. लक्ष्मीकांत देशमुख यांनी विचार व्यक्त केले की, नागरिकांच्या सहकार्याशिवाय महानगराचा विकास होणे केवळ अशक्य आहे, त्यासाठी ही विठ्ठल मंदिर परिसर स्वच्छता विकास समितीची स्थापना पुण्यात नव्या विकासाच्या दिशा देऊन वारजे नाका परिसराचा विकास निश्चित करू शकते.

यापूर्वी हेच कार्य अकोल्यात २१ वर्षापूर्वी आयुक्त असताना इंद्रायणी परिसर विकास समितीने जठार पेठ येथे प्रयोग करून चांगले परिणाम झाल्याचे पहिले आहे. त्यांचा अनुभव व कार्य करणारे श्री.सुनील भागवत आज वारजेतील चैतन्य नगरीत राहत असून समिती स्थापनेत कार्यरत झाले आहे.

मागील महिन्यात स्टर्लिंग सोसायटी, चैतन्य नगरी, ईशान नगरी व अन्य सोसायटी समोरील दुर्गा व शनी मंदिराचा रस्ता पूर्ण स्वच्छता करून कचरा विरहित करण्यात आला आहे. येथील सर्व सोसायटी अपारमेंट ला एकत्र करून स्वच्छतेचे कार्य जाणीवपूर्वक करून समस्या सोडवण्यासाठी ही समिती प्रयत्नशील राहील. या कार्यासाठी प्रभागातील नगरसेविका सौ. दिपालीताई प्रदीप धुमाळ, मा. श्री प्रदीप ऊर्फ बाबा धुमाळ व श्री मनिष धुमाळ यांनी मोलाच्या सहकार्यसह स्वच्छतेसाठी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे नियोजन ही त्यांनी करून या परिसराच्या विकासाचे व्रत पूर्ण करून नागरिकांची मने ही जिंकली.

तत्पूर्वी या परिसरातील अस्वच्छ जागा स्वच्छ करून ईशाननगरी कडे जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी विशेष पथमार्ग करण्याचे नुसते आश्वासनच नाही तर भूमिपूजन सुद्धा श्री. लक्ष्मीकांतजी देशमुख व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.प्रदीप खरे ( अध्यक्ष चैतन्य नगरी फेज 2 ) यांनी केले कार्यक्रमाला मा.वि.दा पिंगळे व शिरपूर पॅटर्नचे श्री. सुरेश खानापूरकर यांनी मोलाचे विचार त्यांच्या कार्यातून उपस्थित नागरिकांना दिले.

Spread the love