Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

सर्वपक्षीय महिलांचा Friday S.P. कट्टा सुरू

मिळूनी साऱ्या जणी
नवीन वर्षात आम्ही काही महिलांनी एकत्र येऊन सर्वपक्षीय महिलांचा Friday S.P. कट्टा सुरू केला आहे. आज त्याचे औपचारिक उद्घाटन सौ. वंदना चव्हाण आणि श्री अंकुश काकडे यांचे उपस्थितीत झाले.

आज प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती सुषमा चव्हाण, कु.क्रांती पवार,सौ.अश्विनी सातपुते ह्या उपस्थित होत्या.मुलींचे लग्नाचे वय २१ करण्याबाबत चर्चा झाली, उलट_सुलट मते व्यक्त झाली,हा विषय १वर्षापूर्वी राज्यसभेत मी उपस्थित केला होता असे चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

अंकुश काकडे यांनी मात्र ह्या निर्णयाबद्दल नापसंती व्यक्त केली.सौ.कमल व्यवहारे,राजलक्ष्मी भोसले,संगीता तिवारी,नीता रजपूत,रुपाली पाटील,गायत्री खडके,अस्मिता शिंदे,पल्लवी जावळे, मनाली भिलारे,मनीषा कावेडिया यांनी हा उपक्रम सुरू केला आहे.

हा उपक्रम सुरू करण्याची प्रेरणा अंकुश आण्णांनी दिली असे कमल व्यवहारे यांनी सांगितले.ह्यावेळी आलेल्या पाहुणयानं चे स्वागत मा महापौर राजलक्ष्मी भोसले जी यांनी त्यांना पुस्तके देवून केले, त्या नंतर मा महापौर कमल व्यवहारे, मा नगरसेविका रुपाली पाटिल आणि मा शिक्षण मंडळ अध्यक्ष श्रीमती संगीता तिवारी यांनी शाल आणि छोटे से रोपटे देवून केले,

Spread the love