Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

तूपे, वाघमारे,शिंदे आणि दिवेकर ठरल्या सिद्धांत आर्ट्सच्या श्रावण सम्राज्ञी

रुपाली चाकणकर रमल्या श्रावणातील जुन्या आठवणीत…

युवती आणि महिलांसाठी श्रावण महिना सणावारांची भरगच्च भेट घेऊन येत असतो.

सर्वत्र चैतन्यमयी वातावरण निर्माण करणाऱ्या या महिन्यात युवतींचे सौंदर्य, आत्मविश्वास, बुद्धिमत्ता आणि विविध कलागुण यांची परीक्षा घेणारी श्रावण सम्राज्ञी सौंदर्य स्पर्धा सिद्धार्थ आर्ट्स यांनी आयोजित केली होती.

स्पर्धेबरोबरच श्रावण मास.. मैत्रीचा खास या अनोख्या कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते.यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी त्यांच्या श्रावणातील आठवणीना उजाळा दिला.

श्रावण सरी आठवणीच्या दारी म्हणत राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या श्रावणातील अनेक आठवणी शेयर केल्या.हा सोहळा 5ऑगस्ट रोजी मापले लॉन्स लोणावळा येथे पार पडला.

श्रावण क्वीन सौंदर्य सम्राज्ञी ही स्पर्धा संपूर्णपणे ऑनलाइन घेण्यात आली.

या स्पर्धेत 80 सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या. त्यातील 10 सौंदर्यवती निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली.त्यातील चारजणी या श्रावण सम्राज्ञी ठरल्या.

त्यांना सिद्धार्थ आर्ट्स यांच्यातर्फे मानाचा मुकुट आणि श्रावण सौंदर्यवती हा किताब देऊन गौरविण्यात आले.

यामध्ये श्रेया तूपे,पूनम वाघमारे, वर्षा राज शिंदे ,रत्न दिवेकर यांना गौरविण्यात आले.

या कार्यक्रमास भाजपा नेत्या चित्रा वाघ ,उद्योजिका राधिका बिर्ला,जयश्री बागूल,निर्मला घुले, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आदि मान्यवर उपस्थित राहून त्यांच्या श्रावणातील आठवणीना उजाळा देणार होत्या पण कोरोना परिस्थितीमुळे त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत,

मात्र राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मात्र त्यांच्या श्रावणातील अनेक आठवणीना उजाळा दिला.

श्रावणातील गावकडची मज्जा,नागपंचमीचे उंच झोके,श्रावणात होणारी धार्मिक पारायणे अशा अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या.

राजकीय व्यासपीठावर आम्ही विरोधक असलो तरी व्यासपीठाच्या पलीकडे मात्र आमची चांगली मैत्री असते.

मैत्री आणि राजकारण या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत.चित्रा वाघ आणि आम्ही एकत्र अनेक आंदोलने गाजविली.

आमच्या आंदोलनाची अवघ्या तास भरात राज्यभरात चर्चा व्हायची,

पण आम्हाला पितासमान असलेल्या 80 वर्षीय शरद पवार साहेबांना जेव्हा आमची गरज होती,

तेव्हा त्यांनी म्हणायला हवे होते साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत,त्यांच्या खांद्यावरील जबाबदारी घ्यायला हवी होती.

पक्ष अडचणीत असताना त्यांनी अनेक कारणे देऊन दुसऱ्या पक्षांचा रस्ता धरला हे मला काही पटलं नाही.

त्यांनी पक्ष सोडला आणि आम्ही विरोधक झालोत,त्या नंतर राजकारणाच्या पलीकडच्या मैत्रीसाठी आम्ही काही विशेष प्रयत्न केले नाहीत.

पण त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा असे मत रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केले.

त्या श्रावण मास.. मैत्रीसाठी खास कार्यक्रमात बोलत होत्या.

राहुल हरिभक्त यांनी रुपाली चाकणकर यांची मुलाखत घेतली त्या प्रसंगी रुपाली चाकणकर यांनी श्रावणातील अनेक आठवणीना उजाळा दिला श्रुती पाटोळे यांनी श्रावण सम्राज्ञी स्पर्धेचे परीक्षण केले.

रत्ना धहीवालकर यांनी सूत्रसंचलन केले तर शुभदा हरिभक्त यांनी रुपाली चाकणकार याचे स्वागत करून सत्कार केला.

जाहिरात / प्रसिद्धिसाठी
संपर्क: शिवाजी मा. हुलवळे
संपादक: छत्रपती मिडीया ग्रुप 
पत्रकार – छायाचित्रकार 
9422306342 / 8087990343

Spread the love