Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

मोदी सरकारने केलेल्या जीवनावश्यक वस्तूंच्या महागाई विरोधात काँग्रेसचे पुण्यात जन आंदोलन

मोदी सरकारच्या इंधन गॅस दरवाढ आणि जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईविरोधात काँग्रेसचे पुण्यात सायकल यात्रा कडून जन आंदोलन

पुणे: मोदी सरकारच्या इंधन गॅस दरवाढ आणि जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईविरोधात काँग्रेसचे आज पुण्यात सायकल यात्रा कडून जन आंदोलन करण्यात आले.

कॅम्प मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळाते विधान भवन सायकल यात्रा काढून मोदी सरकारच्या जीवनावश्यक वस्तूंच्या महागाई विरोधात काँग्रेसने जन आंदोलन केले.

देश जनता की एक ही पुकार गदी छोडो ,मोदी सरकार देश की जनता की बडी भूल , चुन के दिया कमल का फूल नको नको, मोदी सरकार पुन्हा नको, ये सरकार निकमी हे ,काँग्रेस पक्षाचा विजय असो, राहुल गांधींचा विजय असो ,सोनिया गांधींचा विजय असो ,मोदी सरकारचा धिकार असो ,नाना पटोले चा विजय असोअशा आंदोलनाच्या वेळी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून व नेत्यांकडून मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे हे जन आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे आयोजन पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश दादा बागवे यांनी केले .

या आंदोलनाला पुणे पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, रवींद्र धंगेकर ,शैलेंद्र नलावडे, माजी आमदार मोहन जोशी, आबा बागुल, अविनाश बागवे, पुणे शहर काँग्रेस महिला अध्यक्ष कमला व्यवहारे ,पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे  पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंदोलनाच्या वेळी रमेश बागवे म्हणाले मोदी सरकारने पेट्रोल डिझेल गॅस दर वाढवून सामान्य जनतेची लूट केली आहे म्हणून आम्ही दहा दिवस हे आंदोलन पुकारले आहे  सामान्य जनता रिक्षावाले यांची लुट सरकारने केली आहे.

सामान्य जनता रिक्षा वाले सगळे परेशान आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना साहेब पटोले यांनी सामान्य जनते ला महागाई मधून दिलासा भेटला पाहिजे यासाठी आज आम्ही सायकल यात्रा काडून आंदोलन करत आहोत

आम्ही आज जे आंदोलन केले आहे पेट्रोल डिझेल गॅस दरांच्या विरोधात आंदोलन करत आहोत पेट्रोल डिझेल गॅस जीवनावश्यक वस्तूंच्या जो केंद्र सरकारने दर वाढविले आहेत. त्यातून केंद्र सरकारला त्यावरचा टॅक्स केंद्र सरकारच्या खात्यात जमा होणार आहे. 

मागच्या भाजपच्या काळात भाजप सरकारने पेट्रोल डिझेल वरील दर वाढवले होते तेव्हा अटल बिहारी वाजपेयी बैलगाडीतून बसून लोकसभेत गेले होते रोज केंद्र सरकार पंचवीस रुपये डिझेल वाढवून तरच सामान्य जनतेची लूट करत आहे काँग्रेस पेट्रोल डिझेलचे दर वाढवले होते
तेव्हा स्मृती इराणी या बांगड्या भरून लोकसभेत गेल्या होत्या.

जाहिरात / प्रसिद्धिसाठी
संपर्क: शिवाजी मा. हुलवळे
संपादक: छत्रपती मिडीया ग्रुप✒️
पत्रकार-छायाचित्रकार
📱 9422306342 / 8087990343

Spread the love