Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

महाविकास आघाडी सरकारने ३० जून २०२१ रोजी २३ गावांचा पुणे महानगरपालिकेत समावेश केला आहे.

राज्य सरकारच्या निर्णयाने या २३ गावांना विकासाच्या नवनवीन वाटा मोकळ्या होणार आहेत. मात्र ग्रामपंचायत ते महानगरपालिका हे संक्रमण होत असताना दरम्यानच्या काळात अनेक समस्या, अडीअडचणी निर्माण होण्याचीही शक्यता आहे. यासाठी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेऊन सर्व २३ गावांसाठी समन्वयक नियुक्त केले आहेत.

गावांमधील नागरिकांच्या अपेक्षा, समस्या, आव्हाने तसेच समन्वयकांची भूमिका याबाबत नियुक्ती पत्र आज विरोधी पक्षनेत्या सौ.दिपालीताई धुमाळ,माजी महापौर सौ.वैशालीताई बनकर,माजी उपमहापौर श्री.दिलीप बराटे,नगरसेवक श्री.योगेश ससाणे, नगरसेवक श्री.प्रकाश कदम,नगरसेवक श्री.गणेश आबा ढोरे,नगरसेवक श्री. युवराज बेलदरे या सर्व सन्मानिय नगरसेवकांना देण्यात आले.

याप्रसंगी बोलतांना २३ गावाच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच कटिबद्ध आहे असा विश्वास व्यक्त केला.

जाहिरात / प्रसिद्धिसाठी
संपर्क: शिवाजी मा. हुलवळे
संपादक: छत्रपती मिडीया ग्रुप✒️
पत्रकार-छायाचित्रकार
📱 9422306342/
8087990343

Spread the love