Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

रोजगार नसल्यानेच आरक्षणासाठी आज तरुण रस्त्यावर : पृथ्वीराज चव्हाण

पुणे नवरात्रौ महोत्सवतर्फे ‘महर्षी’ पुरस्कराने  ज्ञानेश्वर मुळे सन्मानित
पुणे : आज केंद्र व राज्य सरकारला देश चालवण्यासाठी कर्ज काढावे लागत आहे. डिझेल, पेट्रोलवर कर लावून त्यांच्या कींमती वाढविल्या. त्याबरोबर अनेक कंपन्या विकण्याचे काम सुरू आहे. अनेक उद्योग धंदे, कंपन्या महाराष्ट्रच्या बाहेर गेल्या आहेत . त्यामुळे देशाचा अर्थव्यवस्थेचा विकास खुंटला आहे. तरुणांना रोजगार नसल्याने हेच तरुण आरक्षणासाठी रस्त्यावर उतरले आहेत,
असे मत, माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. आरक्षणावर रोज अल्टिमेट दिले जात आहेत. शासनाकडून आश्वासनांची बोळवण केली जात आहे. देश वाचवण्यासाठी रोजगार निर्मिती करा, खासगीकरण थांबवा, महाराष्ट्राचे नाव बदनाम करण्याचे काम या सरकाने थांबवा, असेही यावेळी त्यांनी सांगीतले.
               

29 व्या पुणे नवरात्रौ महोत्सवतर्फे दिला जाणारा यंदाचा मानाचा ‘महर्षी’ पुरस्कार राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य व ज्येष्ठ साहित्यिक  ज्ञानेश्वर मुळे यांना महाराष्ट्र इंडस्ट्री विकास असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष व एसएमई चेंबर ऑफ इंडियाचे अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे  यांच्या हस्ते गुरुवारी श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे प्रदान करण्यात आला. पुणेरी पगडी, सन्मान चिन्ह, महालक्ष्मीची प्रतिमा व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. गांधीवादी विचारवंत व माजी आमदार उल्हास पवार यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल, पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांनी मान्यवरांचा सत्कार केला. यावेळी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे विश्वस्त घन:श्याम सावंत, नंदकुमार बानगुडे, रमेश भंडारी, नंदकुमार कोंढळकर, मुख्य संयोजक अमित बागुल, सागर बागुल, काँग्रेसचे गोपाळ तिवारी, उद्योजक राकेश राठोड, माजी नगरसेवक रफिक शेख यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थितीत होते.
चव्हाण म्हणाले, सध्या महाराष्ट्राचे नाव राजकारण्यांनी बदनाम केले आहे. याचे परिणाम अनेक पिढ्यांना भोगावे लागणार आहे. आता राजकीय पक्षांवर अवलंबून न राहता नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे.

सत्काराला उत्तर देताना ज्ञानेश्वर मुळे म्हणाले, आमच्यावर साधेपणाचे संस्कार झाले. मला महाराष्ट्राचे संस्कार मिळाल्याने मी येत पर्यंत पोहचलो. जगभरात भ्रमंती केली. अनेक देशात भारतीय संस्कृती, मराठी भाषा पोहचवण्यासाठी काम केले. सध्या जाती व्यवस्था माणसाला पोखरून काढत आहे. ही जाती व्यवस्था मोडून काढण्याचे काम तरुणांनी काम केले पाहिजे. विदेशासह भारतात तरुण अधिकारी निर्माण होत आहे. महात्मा फुले यांच्या विचाराने पुढे गेले पाहिजे. संत विचाराच्या मार्गाने तरुणांनी पुढे गेले पाहिजे.
सध्याची परिस्थिती सुधारण्यासाठी सकरात्मक लाट निर्माण केली पाहिजे. घटनेने दिलेला अधिकार घेतला पाहिजे. लोकशाहीचा उद्धार करण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. जातीव्यवस्था हाच आपला मोठा शत्रू आहे . आज आपण जातीयवादी होत आहे ही मोठी शोकांतिका आहे. आबा बागुल यांनी विविध उपक्रम हाती घेतले आहे, यास मोठा पाठींबा देने गरजेचे आहे.

उल्हास पवार म्हणाले, ज्ञानेश्वर मुळे यांनी सामान्य कुटुंबातुन आपली प्रगती केली. उच्च पदावर जाऊन भारतासाठी कार्य केले, ही अभिमानाची गोष्ट आहे. आबा बागुल विविध उपक्रमाद्वारे तसेच पुरस्कार देऊन त्यांच्या कामाला स्फूर्ती देतात. यामुळे अनेकांना यापासून प्रेरणा देखील मिळते.
चंद्रकांत साळुंके म्हणाले, ऋषितुल्य व्यक्तींचा सन्मान करून त्यांना कार्यरत ठेवण्याचे काम आबा करतात. विविध सामजिक उपक्रम राबवतात. आज शैक्षणिक क्षेत्रात वंचित विद्यार्थ्यांना सहकार्य करा. विद्यार्थीना उद्योजकाकडे अनेक संधी आहेत. ही संधी तरुणांनी घेतली पाहिजे. सध्या अनेक उद्योग महाराष्ट्राबाहेर गेले आहे. त्यामुळे भीती देखील वाटते. उद्योजकांच्या पाठीमागे शासनाने राहिले पाहिजे.

प्रस्ताविक आबा बागूल यांनी केले. ते म्हणाले, गेली 29 वर्षे महोत्सवाच्या अंतर्ग विविध उपक्रम आयोजित करण्यात येते. ऋषितुल्य व्यक्तीमत्वाचा सन्मान करण्यात येतो. सांस्कृतिक महोत्सवाबरोबरच ‘हरवलेले संस्कार’ हा उपक्रम राबविण्यात येतो. यामध्ये मुलांना मार्गदर्शन करण्यात येते.’हॅलो माय फ्रेंड’ हा उपक्रम देखील सुरु केला असून याद्वारे समुपदेशन करण्यात येते. काशीयात्रेसह विविध सामाजिक उपक्रम घेण्यात येते. या नवरात्रौत्सवात अनेक कार्यकर्ते घडत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकणी यांनी केले. घनश्याम सावंत यांनी आभार मानले.

Spread the love