Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

बाबुगेनू चौक, म.फुलेमंडई येथे मराठा बांधव मनोज जारंगे यांच्या समर्थनार्थ लाक्षणिक उपोषण

मराठा क्रांती मोर्चा पुणे
याप्रसंगी मराठानेते राजेंद्र कोंढरे, तुषार काकडे, अमर पवार, बाळासाहेब अमराळे, श्रुतीका पाडळे, युवराज दिसले, गुलाबराव गायकवाड, शिवसेनेचे शहरप्रमुख गजानन थरकुडे, बाळासाहेब मारणे, राजेंद्र कुंजीर यांच्यासह असंख्य महिला, युवक व जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

यावेळी तुषार काकडे म्हणाले की जरी हे आंदोलन एक महिन्यासाठी स्थगित केले असेल तरी आमचा लढा संपलेला नाही. यावेळीही फसवणूक झाली तर आम्ही २०१६ सारखा संयम बाळगू याचा मात्र भरवसा नसेल व त्यास सरकार जबाबदार असेल !

अमर पवार यांनी तीव्र निषेध नोंदवला व म्हणाले की मराठा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार, खासदार यांनी आता तरी धडा घ्यावा व समाजासाठी आवाज उठवावा. अन्यथा निडणुकीत समाज धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही.

जालन्यातील जरांगे पाटील यांनी सकाळी उपोषण सोडले म्हणून सकाळी ११ वाजता सुरू झालेले उपोषण श्रावणी मेमाणे या बालिकेच्या हस्ते उपस्थितांना फळांचा रस पाजून स्थगित करण्यात आले.

कृपया प्रसिद्धी देऊन आमच्या लढ्याला बळ द्यावे ही नम्र विनंती.
आ.वि.
तुषार काकडे
(राज्य समन्वयक. मराठा क्रांती मोर्चा)

Spread the love