Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

स्वातंत्र्यवीर सावरकर – निबंध स्पर्धा पारितोषिक वितरण सोहळा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीप्रमाणे ३४८ व्या राज्याभिषेकाच्या सोहळ्यानिमित्त व स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त आयोजित निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा आज बुधवार दिनांक २३ जून २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता नित्यानंद हाँल, हिंगणे खुर्द येथे मा. महेशजी करपे, कार्यवाह, महानगर पुणे यांचे शुभहस्ते व पर्वती मतदार संघ आमदार माधुरीताई मिसाळ व खडकवासला मतदार संघ आमदार भीमरावजी तापकीर यांचे उपस्थितीत पार पडला.

या स्पर्धेला सिंहगडरोड वासियांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.
प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांक व दोन उत्तेजनार्थ असे चार गटातील एकूण वीस जणांना पारितोषिके व ट्राँफी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

विजेत्यांपैकी कु. वैष्णवी पुजरवाड हिने स्पर्धकांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरुपात आयोजित कार्यक्रमाबद्दल आभार मानले तसेच पालकांपैकी शर्वरी कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचे कौतुक करुन या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचारांबद्दल अधिक माहीती मिळाली याबद्दल अँड. प्रसन्नदादा जगताप व मित्रपरिवाराचे आभार मानले.

तसेच गेले वर्ष – दिड वर्ष करोनाच्या कठीण काळात जीवाची पर्वा न करता कार्य करणार्या डाँक्टर्स, संघ स्वयंसेवक, कार्यकर्ते यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

मा.महेशजी करपे व मंगेशजी पाटील यांनीही आपले मार्गदर्शन पर भाषणात सदर उपक्रमाचे व अँड. प्रसन्नदादा जगताप यांनी करोना काळात आयोजित केलेल्या विविध सामाजिक कार्याचे खूप मनापासून भरभरून कौतुक केले.

Spread the love