Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

सुस-म्हाळुंगे गावांसोबत पुणे म.न.पा. हद्दीत समाविष्ठ गावांच्या पाणी प्रश्नाबाबत उच्च न्यायालयामध्ये PMRDA व PMC विरोधात श्री.अमोल बालवडकर यांच्या वतीने जनहित याचिका दाखल

PIL (st) .no.6259/2022.. Mr. Amol Ratan Balwadkar vs PMC & Anr
अॅड. सत्या मुळे यांच्या मार्फत….

१.सुस-म्हाळुंगे नागरिकांचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी मी हाय-कोर्टात याचिका दाखल केली.

२.PMRDA – PMC नागरिकांचे मुलभूत प्रश्न सोडविण्याकडे दुर्लक्ष करत आहे.

३.PMRDA व PMC पाण्याची जबाबदारी स्विकारत नाही.

४.कायद्याप्रमाणे जर PMRDA बांधकाम नकाशे मंजूर करत असेल तर पाणी देण्याची जबाबदारी सुद्धा PMRDA ची आहे आणि जर जबाबदारी स्विकारत नसाल तर PMRDA ने बांधकाम नकाशे मंजूर करणे थांबवावे जेणेकरून या भागाचा पाणी प्रश्न अजून गंभीर होणार नाही.

५.आम्ही मा.उच्च न्यायालयाकडे मागणी केली आहे कि, या भागातील नागरिकांना मुलभूत गरज असलेले पाणी देण्याची जबाबदारी कोणाची..? हे स्पष्ट करावे.

६.जर पाणी देण्याची जबाबदारी PMRDA स्विकारत नसेल तर त्यांना बांधकाम नकाशे मंजूर करण्यासाठीचे अधिकार उच्च न्यायालयाने काढून घ्यावेत.

७.पाण्याबाबत बिल्डरांकडून हमीपत्र घेणे PMRDA ने थांबवावे.

८.समाविष्ट गावातील सोसायटींना / बांधकामांना पिण्याचे पाणी मिळण्यासाठी पाण्याच्या टाक्या, पाण्याच्या पाईप लाईन्स व इतर मुलभूत पायाभूत सुविधा करण्याचे काम संबंधित यंत्रणेने सुरु करावे व तो पर्यंत या सोसायटींना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु करावा.

९.PMC ने समाविष्ठ गावांना पाणी पुरवठा करण्याबाबत आराखडा उच्च न्यायालयात सादर करावा. त्यासाठी किती महिने / किती वर्ष लागणार आहे हे स्पष्ट करावे.
कळावे…

Spread the love