Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

‘सुरोत्सवा’स रसिकांचा चांगला प्रतिसाद – बेला शेंडे यांच्या गाण्यावर थिरकले रसिक – चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांचा नागरी सत्कार

ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास,
आनंदाची आणि भरभराटीची जाओ..
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!

‘सुरोत्सवा’स रसिकांचा चांगला प्रतिसाद
बेला शेंडे यांच्या गाण्यावर थिरकले रसिक
चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांचा नागरी सत्का

पुणे : ‘कोथरूड सुरोत्सव’ उत्सव सुरांचा दिवाळी पहाट दोन दिवसीय कार्यक्रमास रसिकांचाा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.  ‘कोथरूड सुरोत्सवाच्या पहिल्या दिवशी 20 ऑक्टोबर 2022 रोजी पहाटे सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे व सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका अमृता नातू आपल्या शास्त्रीय गायनाने  रसिकांना मंत्रमुग्ध केलेे होते.

तर दुसर्‍या दिवशी 21 ऑक्टोबर 2022 रोजी सांयकाळी  सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांनी सदाबाहर गाणे सादर केली. यावेळी बेला शेंडे यांच्या गाण्यावर रसिक  थिरकले होते.  कार्यक्रमाचे आयोजन सौ.हर्षाली दिनेश माथवड (मा, नगरसेविका, पुणे मनपा) आणि सामाजिक कार्यकर्ते दिनेश माथवड यांनी नॉर्थ डहाणूकर मैदान, कोथरूड पुणे येथे केले असून कार्यक्रमाचे नियोजन डी के एंटरटेंन्टमेंटस् पाहिले होते.

‘कोथरूड सुरोत्सव’ कार्यक्रमात पुणे जिल्हा पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल आमदार चंद्रकांत पाटील आणि भाजपा महाराष्ट्र सरचिटणीस पदी मुरलीधर मोहोळ यांची निवड झाल्याबद्दल छत्रपती शिवाजी महारांची मुर्ती भेट देवून भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
—-  आपले नेहमीच सहकार्य असते पुढे ही असेच राहिल आशा बाळगतो.

Spread the love