Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

यशस्वी  संस्थेतर्फे  शिक्षक  दिन उत्साहात  साजरा

पिंपरी  : दिनांक ६ सप्टेंबर  २०२१ : यशस्वी एज्युकेशन  सोसायटीचे इंटरनॅशनल  इन्स्टिट्यूट  ऑफ मॅनेजमेंट  सायन्स   व यशस्वी  एकेडमी फॉर स्किल्स संस्थेच्या वतीने शिक्षक  दिनाचे औचित्य साधून संस्थेतील शिक्षकांचा सत्कार करण्यात  आला.

शिक्षकांनी अध्यापनाचे  कार्य करीत असताना स्वतःमधील  विद्यार्थी कायम जागा ठेवला पाहिजे तसेच आगामी काळात होणारे तंत्रज्ञानातील वेगवान बदल लक्षात  घेऊन स्वतःच्या अध्यापन शैलीत  त्यानुसार योग्य ते बदल  करायला हवेत असे मत यावेळी बोलताना  यशस्वी संस्थेच्या अप्रेन्टिस विभागाचे संचालक संजय छत्रे  यांनी व्यक्त केले.

अध्यापन  करीत असताना आपण ज्यावेळेस आपले योगदान दोनशे टक्के देण्याचा  प्रयत्न करू त्यावेळी विद्यार्थ्यांना शंभर टक्के आकलन  होण्यास मदत होईल.

एक आयुष्य घडविण्याचे मोलाचे कार्य  शिक्षकी पेशामुळे  आपल्याला मिळाले आहे याचे मोल व महत्व  अनन्यसाधारण आहे  हे  लक्षात  ठेवूनच शिक्षकांनी आपापली भूमिका बजवावी असेही  छत्रे  यांनी सांगितले. 

याप्रसंगी  सरस्वती मातेच्या प्रतिमेला  व डॉ. सर्वपल्ली  राधाकृष्णन  यांच्या प्रतिमेला  पुष्पहार अपर्ण करून अभिवादन करण्यात  आले. तसेच यशस्वी संस्थेतील  कर्मचाऱ्यांच्या इयत्ता दहावी व बारावीत उत्तीर्ण  झालेल्या पाल्यांनाही  भेटवस्तू  देऊन त्यांचे कौतुक  करण्यात  आले.

यावेळी अश्विनी  घनवट  व प्रिया पवार या शिक्षिकांनी  आपल्या मनोगतातून  डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन  यांच्या जीवनचरित्राचा  परिचय करून देत  शिक्षक  दिनाविषयी माहिती सांगितली.   

काही शिक्षकांनीही  यावेळी आपली मनोगते व्यक्त केली.  याप्रसंगी कार्यक्रमाला  व्यासपीठावर   यशस्वी संस्थेच्या मनुष्यबळ व्यवस्थापिका  मनिषा  खोमणे, यशस्वी संस्थेच्या ऑपरेशन  विभागाचे उपाध्यक्ष  कृष्णा सावंत, संस्थेच्या अधिष्ठाता डॉ. सुनिता  पाटील व आयआयएमएस चे पवन शर्मा उपस्थित  होते.
 
१)  यशस्वी एज्युकेशन  सोसायटीचे इंटरनॅशनल  इन्स्टिट्यूट  ऑफ मॅनेजमेंट  सायन्स   व यशस्वी  एकेडमी फॉर स्किल्स संस्थेच्या वतीने शिक्षक  दिनाचे औचित्य साधून संस्थेतील शिक्षकांचा सत्कार करताना यशस्वी संस्थेच्या अप्रेन्टिस विभागाचे संचालक संजय छत्रे, यावेळी व्यासपीठावर  डावीकडून पवन शर्मा, डॉ. सुनीता पाटील, मनिषा खोमणे व कृष्णा सावंत.      
 
२) यशस्वी एज्युकेशन  सोसायटीचे इंटरनॅशनल  इन्स्टिट्यूट  ऑफ मॅनेजमेंट  सायन्स   व यशस्वी  एकेडमी फॉर स्किल्स संस्थेच्या वतीने शिक्षक  दिनाच्या कार्यक्रमात  बोलताना यशस्वी संस्थेच्या अप्रेन्टिस विभागाचे संचालक संजय छत्रे, यावेळी व्यासपीठावर  डावीकडून पवन शर्मा, डॉ. सुनीता पाटील, मनिषा खोमणे व कृष्णा सावंत.  
३)  यशस्वी एज्युकेशन  सोसायटीचे इंटरनॅशनल  इन्स्टिट्यूट  ऑफ मॅनेजमेंट  सायन्स   व यशस्वी  एकेडमी फॉर स्किल्स संस्थेच्या वतीने शिक्षक  दिनाच्या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना  यशस्वी संस्थेच्या अप्रेन्टिस विभागाचे संचालक संजय छत्रे, यावेळी व्यासपीठावर  डावीकडून पवन शर्मा, डॉ. सुनीता पाटील, मनिषा खोमणे व कृष्णा सावंत.   
४)  यशस्वी एज्युकेशन  सोसायटीचे इंटरनॅशनल  इन्स्टिट्यूट  ऑफ मॅनेजमेंट  सायन्स   व यशस्वी  एकेडमी फॉर स्किल्स संस्थेच्या वतीने शिक्षक  दिनाच्या कार्यक्रमात सरस्वती मातेच्या प्रतिमेला  व डॉ. सर्वपल्ली  राधाकृष्णन  यांच्या प्रतिमेला  पुष्पहार अपर्ण करून अभिवादन करताना यशस्वी संस्थेच्या अप्रेन्टिस विभागाचे संचालक संजय छत्रे.

जाहिरात / प्रसिद्धिसाठी
संपर्क: शिवाजी मा. हुलवळे
संपादक: छत्रपती मिडीया ग्रुप ✒️
पत्रकार – छायाचित्रकार
9422306342 / 8087990343

Spread the love