Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

पाषाण-सुस खिंड पुलाचा लोकार्पण सोहळा संपन्न.

आज पाषाण-सुस खिंड नविन पुलाचा लोकार्पण सोहळा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला. पुण्याचे पश्चिम प्रवेशद्वार म्हणुन बाणेर-बालेवाडी-पाषाण भागाला ओळखले जाते. गेली अनेक वर्षांपासुन या भागातील स्थानिक नागरीक सातत्याने या पुलाची मागणी करत असताना पुणे महापालिकेने तब्बल ४१ कोटी रुपये खर्च करुन या पुलाची उभारणी केली. यावेळी "राष्ट्रीय महामार्ग ४ लगत असलेल्या १२ मी.

सर्व्हिस रस्त्याकरीता भरघोस निधी उपलब्ध करुन देवुन लवकरच हे सर्विस रस्ते विकसित केले जातील तसेच नव्याने उभारण्यात आलेल्या या पुलाला सर्व नागरीकांच्या मागणीनुसार "राजमाता जिजाऊ उड्डाण पुल" असे नामकरण देखिल करण्यात येईल" असे यावेळी चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

तसेच सुस रोड येथील कचरा प्रकल्पामुळे त्रस्त असलेल्या नागरीकांना लवकरच या संबंधित कचरा प्रकल्प स्थलांतरीत करण्याकरीता देखिल प्रयत्न करणार असल्याचे आश्वासित केले. मागील ५ वर्षांमध्ये पुणे महापालिका व भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातुन पुणे शहरातील नागरीकांच्या भविष्याच्या दृष्टीने अनेक महत्कांशी प्रकल्प यशस्वीपणे राबवुन पुण्याच्या विकासाला गती दिल्याचे यावेळी सांगितले.

"सर्वसामान्य पुणेकराला केंद्रस्थानी ठेवुन व वाढती लोकसंख्या लक्षात घेवुन तसेच पुण्याचा पुढील ५० वर्षांचा विचार करुन रस्ते विकास, २४x७ समान पाणी पुरवठा योजना, जाईका प्रकल्प, २०० ई-बस, कचरा विलगीकरण प्रकल्प असे विविध विकासकामे भारतीय जनता पार्टीने या शहरात राबवले असल्याचे" पुण्याचे माझी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. यावेळी "गेली १५ वर्ष नागरीकांची मागणी असुनही प्रलंबित असलेला व २०१७ च्या निवडणुकिपुर्वी भारतीय जनता पार्टीचा उमेद्वार म्हणुन बाणेर-बालेवाडी-पाषाण-सुस च्या नागरीकांना दिलेला शब्द या पुलाच्या लोकार्पण सोहळ्याने पुर्ण होत असल्याचा आनंद वाटत आहे.

मागील काळात राष्ट्रवादी कॅांग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी फक्त २ कोटी रुपये तुटपुंजी अशाप्रकारचा निधी या पुलासाठी उपलब्ध करुन दिला व हे काम असेच प्रलंबित ठेवले, परंतु आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांनी पुणे महापालिकेच्या माध्यमातुन तब्बल ४१ कोटी रुपये निधी मंजुर करुन आणला व आज या पुलाचे काम पुर्ण करुन घेतले. तसेच या पुलामुळे या भागातील सर्वात मोठी असणारी वाहतुक कोंडीची समस्या संपुष्टात येणार आहे" असे मत नगरसेवक अमोल बालवडकर यांनी व्यक्त केले.

यावेळी या महामार्गालगत असणार्या १२ मी.सर्व्हिस रस्त्याचे काम देखिल पुणे महापालिकेच्या माध्यमातुन तातडीने पुर्ण करण्यात यावे अशी आग्रही भुमिका यावेळी मा.नगरसेवक अमोल बालवडकर यांनी मांडली.

यावेळी विधान परिषद उपसभापती निलम गोर्हे, आमदार भिवराव तापकिर, मा.महापौर मुरलीधर मोहोळ, महापालिका अति.आयुक्त कुणाल खेमनार, मा.नगरसेवक अमोल बालवडकर, मा.स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, मा.सभागृह नेते गणेश बिडकर, मा.नगरसेविका ज्योती कळमकर, मा.नगरसेविका स्वप्नाली सायकर, मा.नगरसेवक किरण दगडे पाटील, मा.नगरसेवक दिलिप वेडे पाटील, मा.नगरसेवक दिपक पोटे, मा.महापौर दत्तात्रय गायकवाड, मा.नगरसेवक ज्ञानेश्वर तापकिर, प्रकाशतात्या बालवडकर, मा.नगरसेवक जयंत भावे, मा.नगरसेवक सनि निम्हण, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, लहु बालवडकर, राहुल कोकाटे, भाजपा कोथरुड वि.अध्यक्ष पुनित जोशी, सुनिल माने, सचिन पाषाणकर, मा.सरपंच नारायण चांदेरे, अनिल ससार, शरद भोते, नितिन रनवरे, सचिन दळवी, शिवम सुतार तसेच पुणे महापालिकेचे अधिकारी व बाणेर-बालेवाडी-पाषाण-सुस-म्हाळुंगे परिसरातील सर्व नागरीक उपस्थित होते.

Spread the love