Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

श्रीनिवास पाटील फाउंडेशन प्रस्तुत Yuva 360 प्रकल्पांतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘कर हर मैदान फ़तेह’

: व्यक्तिमत्व विकास व प्रभावी संभाषण कौशल्य कार्यशाळा नुकत्याच विविध महाविद्यालयांमध्ये संपन्न झाल्या. यामध्ये कराड येथील सद्गुरू गाडगे महाराज काॅलेज, शिक्षण मंडळ कराड संचलित महिला महाविद्यालय, विंग येथील गायत्री कॉम्प्युटर, उंब्रजचे सौ.मंगलताई रामचंद्र जगताप महिला महाविद्यालय, सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, वर्ये येथील कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च व कराडचे वेणूताई चव्हाण कॉलेज या महाविद्यालयांनी आपला सहभाग नोंदवला.

सदर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागासह उत्तम प्रतिसाद कार्यशाळांसाठी मिळाला.
श्रीनिवास पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. Sarang Shriniwas Patil यांनी कार्यशाळांमध्ये विद्यार्थ्यांना विविध विषयांवर सखोल व दिशादर्शक मार्गदर्शन केले.

उत्तम संभाषण कौशल्य, सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासह एक चिकित्सक, जागरूक बुद्धीचा व समाजशील जाणिवा प्रगल्भ असणारा विद्यार्थी घडविण्याच्या शैक्षणिक संस्थांच्या व्यापक ध्येय-धोरणास योगदान देण्याचा या उपक्रमाच्या माध्यमातून श्रीनिवास पाटील फाउंडेशनचा प्रयत्न आहे.

कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी सर्व सहभागी कॉलेजचे सन्माननीय प्राचार्य, प्राध्यापक वृंद, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांचे मोलाचे योगदान व सहकार्य लाभले. याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद!

Spread the love