Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

सिग्नलवर वस्तू विकणाऱ्या मुलांना हक्काचे शिक्षण मिळण्यासाठी महानगरपालिकेत देणार ठराव
-आबा बागुल
      

शाही अभ्यंगस्नान, फराळाच्या आस्वादाने
‘त्यांचा’ही दीपोत्सव झाला आनंदमय  

पुणे : रांगोळ्यांचा थाट, मांडलेला पाट, सुगंधी तेल-उटण्यांचा सुवास, औक्षणाचे ताट, गोडाचा घास आणि त्यावर चढलेला नव्या कपड्यांचा साज या साऱ्यांचा अविस्मरणीय अनुभव मिळाल्याने ‘त्यांचा’ही दीपोत्सव आनंदमय झाला.

शाही अभ्यंगस्नान आणि मनसोक्त फराळाचा आनंद घेताना ही मुले भारावून गेली.

निमित्त होते, पदपथ-सिग्नलवर वस्तू विकणाऱ्या मुलांसाठी पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल आणि पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल यांनी आयोजित केलेल्या ‘ मानवधर्म जोपासणारे अभ्यंगस्नानाचे!

नामदार गोखले रस्त्यावरील गुडलक चौकात झालेल्या या अनोख्या उपक्रमाने पदपथावर वस्तू विकणाऱ्या मुलांमुलींची बुधवारची सकाळ सुखद ठरली.

खेळण्या-बागडण्याचे आणि शिकण्याचे वय असतानाही परिस्थितीने पोटाची खळगी भरण्यासाठी दररोजची सकाळ रोजगारासाठीच उजाडते. ना दसरा ना दिवाळी असे खडतर जीवन जगणाऱ्या या मुलांना आपल्याप्रमाणेच दिवाळीचा आनंद लुटता यावा, यासाठी बागुल पिता-पुत्र आणि मित्रपरिवाराने गेल्या नऊ वर्षांपासून हा उपक्रम हाती घेतला आहे.

शाही अभ्यंगस्नानानंतर या मुलांना नवे कपडे, फराळ आणि फटाके अशी मेजवानी मिळाल्याने मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. तर या आनंदमय सोहळ्याने बालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

कार्यकर्त्यांकडून परिसराची स्वछता करून येथे रांगोळ्यांचा सडा घालण्यात आला होता. त्यावर पाट मांडून प्रत्येक मुलाला उटणे लावून स्नान घालण्यात आले. त्यानंतर औक्षण करून, नवे कपडे आणि फराळ देण्यात आला. 

आबा बागुल,अमित बागुल, घनश्याम सावंत, नंदकुमार कोंढाळकर,महेश ढवळे,सागर आरोळे, राहुल बागूल, इम्तियाज तांबोळी,समीर शिंदे,सुरेश गायकवाड, सुरज सोनावणे,लक्ष्मण कुतवळ, ओंकार साळवे,अभिषेक बागुल, विश्वास दिघे,संजय भगत,नितीन गोरे, रवी मोरे,राजू देवेंद्र, सचिन महांगडे,राहुल तौर आणि समस्त बागुल कुटुंबियांसह कार्यकर्त्याकडून या मुलांना सुवासिक तेल-उटणे लावून मंगलमय वातारणात झालेला अभ्यंगस्नानाचा हा सोहळा रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत होता आणि नागरिकही त्यात सहभागी होत होते.

संयोजक आबा बागुल म्हणाले की, आम्ही गेल्या नऊ वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहोत. महागाई दिवसेंदिवस वाढत आहे.

परिस्थितीने पदपथावर राहणाऱ्या आणि पोटाची खळगी भरण्यासाठी शिकण्या-खेळण्याच्या वयात सिग्नलवर फुले किंवा अन्य वस्तू विकणाऱ्या या मुलांना दिवाळीचा आनंद मिळावा, या उद्देशाने आम्ही हा उपक्रम राबवित असतो.

त्याबरोबरच वर्षभर विधायक उपक्रम राबविले जातात. शिक्षणाच्या वयात पोटाची खळगी भरण्यासाठी सिग्नलवर वस्तू विकाव्या लागतात ही दुर्दैवी बाब असून या मुलांची शिक्षणाची व्यवस्था होण्यासाठी महानगरपालिकेत ठराव देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करणार असून अनेक स्वयंसेवी संघटनांनी यासाठी पुढाकार घ्यावा असे आबा बागुल म्हणाले.

जाहिरात / प्रसिद्धिसाठी
संपर्क: शिवाजी मा. हुलवळे
संपादक: छत्रपती मिडीया ग्रुप ✒️
पत्रकार – छायाचित्रकार
9422306342 / 8087990343

Spread the love