Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

श्रीमत भगवत गितेत प्रत्येक प्रश्नाचे उत्तर प्रा.डाॅ.मंगेश कराड; एमआयटी एडीटीमध्ये विश्व-संस्कृत दिवस साजरा

पुणे, दि. १२- ‘श्रीमत भगवत गितेत मानवाला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दडलेले असून प्रत्येक विद्यार्थ्यांने ती वाचून तिच्यात सांगितलेली तत्वे अंगीकारली पाहिजेत,’ असे प्रतिपादन एमआयटी आर्ट डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाचे कुलगुरु तथा कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड यांनी केले.

ते, विद्यापीठाच्या स्कूल ऑफ वेदिक सायन्सेस् आणि स्कूल ऑफ ह्यूमॅनिटीज् यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विश्व-संस्कृत-दिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी विद्यापीठाचे परिक्षा नियंत्रक डॉ. ज्ञानदेव नीलवर्ण, अधिष्ठाता डॉ. प्रिया सिंग, डाॅ. अतुल पाटील, डॉ. माधवी गोडबोले आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना, प्रा.डाॅ.कराड यांनी संस्कृत भाषेची आधुनिक उपायोजिता मांडताना, संस्कृत भाषेच्या अभ्यासाने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीन विकास कसा होतो याकडे सर्वांचे लक्ष वेधले. विद्यार्थ्यांनी आपले संपूर्ण जीवन धर्म, अर्थ, काम व मोक्ष या चारही पुरुषार्थांच्या आधारे व्यथित करून उत्तुंग जीवनाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. हे सांगत असताना आदिशंकराचार्यांपासून विविध आचार्यांनी भारतीय परंपरांसाठी केलेल्या योगदानाचा आढावाही त्यांनी घेतला.

आपल्या स्वागत पर भाषणामध्ये डॉ. माधवी गोडबोले यांनी संस्कृत दिवस का साजरा केला जातो? व संस्कृत भाषेचे आधुनिक काळातील महत्त्व अधोरेखित केले. यानिमित्ताने विभागातील विद्यार्थ्यांनी संस्कृत भाषेचा एकोणिसाव्या शतकापर्यंतच प्रवास दर्शवणारी नाटिका सादर केली. तसेच श्लोक पाठांतर स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा इत्यादींद्वारे विद्यार्थ्यांच्या उत्फुर्त प्रतिसादात हा उपक्रम पार पडला.

Spread the love