Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा २०१९ च्या पुणे विभागाचा निकाल जाहीर

राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत नारायण पेठेतील संयुक्त प्रसाद मित्र मंडळ प्रथम

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा २०१९ मध्ये पुणे शहर महापालिका क्षेत्र विभागात नारायण पेठेतील संयुक्त प्रसाद मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर, श्री सुभाषनगर माडीवाले वसाहत गणेशोत्सव मंडळाने द्वितीय, कॅम्पमधील श्रीकृष्ण तरुण मंडळाने तृतीय, नाना पेठेतील काळभैरवनाथ तरुण मंडळाने चौथे तर सिटी पोस्ट चौक बुधवार पेठेतील महाराष्ट्र तरुण मंडळाने पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले आहे.

स्पर्धेत सहभागी झालेल्या १६२ मंडळांपैकी ११२ मंडळांनी पारितोषिके मिळविली असून एकूण १५ लाख ९ हजार रुपयांची बक्षिसे या मंडळांना देण्यात येणार असल्याची घोषणा ट्रस्टचे विश्वस्त उत्सव प्रमुख हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत केली.

यावेळी ट्रस्ट चे डॉ.रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, हेमंत रासने, कुमार वांबुरे, अक्षय गोडसे, अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, राजाभाऊ घोडके, ज्ञानेश्वर रासने उपस्थित होते.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार, दिनांक १४ आॅगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे होणार आहे. राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत संयुक्त प्रसाद मित्र मंडळाच्या प्लास्टिक खेळण्यापासून श्री मूर्ती या देखाव्याला ५१ हजार रुपयांचे, श्री सुभाषनगर माडीवाले वसाहत गणेशोत्सव मंडळाच्या आकर्षक सजावट या देखाव्यास ४५ हजारांचे, श्रीकृष्ण तरुण मंडळाच्या गाझी पाणबुडी हल्ला या देखाव्यास ४० हजारांचे, काळभैरवनाथ तरुण मंडळाच्या नदी जोड प्रकल्प या देखाव्याला ३५ हजारांचे आणि महाराष्ट्र तरुण मंडळाच्या तुमच्यातला एक मी या देखाव्याला ३० हजार रुपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले.

यंदाचा जय गणेश भूषण पुरस्कार धनकवडीतील आदर्श मित्र मंडळाला देण्यात येणार आहे. रुपये १ लाख व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. स्पर्धेच्या परीक्षण मंडळात पराग ठाकूर, डॉ.अ.ल.देशमुख, विजय चव्हाण, कै. अनिल घाणेकर, मधुकर जिनगरे, बापू पोतदार, सुधीर दारव्हेकर, जयश्री बोकील यांसह सहाय्यक म्हणून बाळकृष्ण घाटे, लिंगराज पाटील, शुभम साळुंके, सौरभ साळेकर, दीप राणे यांनी काम पाहिले.

  • इतर निकाल :-
    १) पश्चिम विभाग :- श्री भैरवनाथ तरुण मंडळ (प्रथम), विनायक नवयुग मित्र मंडळ (द्वितीय), आझाद मित्र मंडळ (तृतीय), गोखले स्मारक चौक तरुण मंडळ व संगम तरुण मंडळ (उत्तेजनार्थ). सोसायटी गणेशोत्सव – स्वास्तिश्री स.गृ. मर्यादित कर्वेनगर (प्रथम), रोहन सोसायटी फेज १ भोसलेनगर (द्वितीय), सदाशिव गृ. र. संस्था मर्यादित भेलकेनगर, किंग्ज ग्रुप श्री गणेश मित्र मंडळ (तृतीय) त्रिदल गणेश मंडळ ट्रस्ट, ब्रह्मा मेमरीज गणपती मंडळ (उत्तेजनार्थ). सांस्कृतिक देखावे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेवक हनुमान मंडळ (प्रथम), नवजवान मित्र मंडळ (द्वितीय), श्री जल्लोष सांस्कृतिक मंडळ (तृतीय). काल्पनिक देखावे – परोपकार मित्र मंडळ पांडवनगर. सजीव देखावे – एकी तरुण मंडळ (प्रथम), अखिल जनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (द्वितीय). धार्मिक व पौराणिक देखावे – श्रीकृष्ण तरुण मंडळ. सामाजिक कार्य (बक्षिसपात्र) – एरंडवणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. वैज्ञानिक (बक्षिसपात्र) – नवभारत मित्र मंडळ, भेलकेनगर.

२) पूर्व विभाग :- नवरंग मित्र मंडळ (प्रथम), अखिल गणेशबाग मित्र मंडळ (द्वितीय), हनुमान मित्र मंडळ (तृतीय). काल्पनिक देखावे (बक्षिसपात्र) – नवयुग मित्र मंडळ (प्रथम), हनुमान मित्र मंडळ (द्वितीय). सामाजिक देखावे – श्रीकृष्ण मित्र मंडळ (प्रथम), वंदे मातरम मित्र मंडळ (द्वितीय). सोसायटी – शिवालय स.गृ.सं.म. भेकराईनगर.

३) उत्तर विभाग :- नवज्योत मित्र मंडळ ट्रस्ट (प्रथम), शिवराज मित्र मंडळ (द्वितीय), दर्शक तरुण मंडळ (तृतीय), सजीव देखावे – गवळीवाडा तरुण मंडळ. सामाजिक देखावे – जनतानगर मित्र मंडळ (प्रथम), विकास तरुण मंडळ (द्वितीय), क्रांतीवीर लहुजी वस्ताद मित्र मंडळ येरवडा (तृतीय). पौराणिक देखावे – अमर मित्र मंडळ (प्रथम), सुवर्णयुग मित्र मंडळ लोहगाव (द्वितीय).

४) दक्षिण विभाग :- साईनाथ मित्र मंडळ (प्रथम), सरिता विहार स.गृह.संस्था मर्यादित (द्वितीय), कै. मिनू मेहता सहकारी मित्र मंडळ कोंढवा (तृतीय). सजीव देखावे – शूर शिवबा मित्र मंडळ (प्रथम), दर्शन मित्र मंडळ (द्वितीय). सांस्कृतिक देखावे – अष्टविनायक मित्र मंडळ (प्रथम), जय महाराष्ट्र मित्र मंडळ (द्वितीय). सोसायटी – सावंत विहार फेज ३ (प्रथम), महेश सोसायटी बिबवेवाडी (द्वितीय), ओंकारस्वरुप को आॅप हाऊ सोसायटी कात्रज (तृतीय). ऐतिहासिक देखावे – उदय मित्र मंडळ दत्तवाडी सामाजिक देखावे – युगंधर मित्र मंडळ (प्रथम), रामेश्वर मित्र मंडळ (द्वितीय), श्री वाघजाई मित्र मंडळ पर्वती गांव (तृतीय).

५) मध्य (उत्तर) विभाग :- मेहुणपुरा सार्व. गणेशोत्सव मंडळ (प्रथम), सो.क्ष.कासार गणेशोत्सव मंडळ (द्वितीय), अश्विनी महिला विकास मित्र मंडळ (तृतीय). सामाजिक देखावे – मुठेश्वर मित्र मंडळ. धार्मिक/ पौराणिक देखावे – श्रीराम अभिमन्यू मंडळ ट्रस्ट (प्रथम), प्रभात प्रतिष्ठान (द्वितीय). वैज्ञानिक देखावे (बक्षिसपात्र) – शिवशक्ती मित्र मंडळ. सजीव देखावे – फणी आळी तालीम ट्रस्ट (प्रथम), ओम हरी हरेश्वर मित्र मंडळ (द्वितीय), माती गणपती मंडळ (तृतीय). उत्तेजनार्थ – विधायक मित्र मंडळ (प्रथम), उंब-या गणपती मंडळ ट्रस्ट (द्वितीय), श्री शिवाजी मित्र मंडळ भवानी पेठ (तृतीय). काल्पनिक देखावे (बक्षिसपात्र) – श्री गजानन मित्र मंडळ.

६) मध्य (दक्षिण) विभाग :- कस्तुरे चौक तरुण मंडळ (प्रथम), वीर शिवराज मित्र मंडळ (द्वितीय), श्रमदान मारुती मंडळ (तृतीय). सजीव देखावे – वीर हनुमान मित्र मंडळ (प्रथम), जय बजरंग मित्र मंडळ (द्वितीय), जय जवान समता मित्र मंडळ (तृतीय). उत्तेजनार्थ – नवभारत सेवक मंडळ (प्रथम), जय जवान मित्र मंडळ नाना पेठ (द्वितीय). सामाजिक देखावे – साखळीपीर राष्ट्रीय मारुती मंदिर ट्रस्ट (प्रथम), अष्टविनायक मित्र मंडळ (द्वितीय). धार्मिक/ पौराणिक देखावे – आपला मारुती मंडळ (प्रथम), शिवांजली मित्र मंडळ (द्वितीय), अकरा मारुती कोपरा सार्व. गणेशोत्सव ट्रस्ट (तृतीय), उत्तेजनार्थ – पद्मशाली सम्राट मित्र मंडळ (प्रथम), साई ग्रुप ट्रस्ट भवानी पेठ (द्वितीय). सोसायटी – बी.यु.भंडारी स.गृ.सं.म. नाना पेठ (प्रथम), वास्तुशारद सह.गृ.संस्था मर्यादित (द्वितीय). सांस्कृतिक देखावे – अकरा मारुती चौक सार्वजनिक गणेशोत्सव (प्रथम), लोकमान्य टिळक प्रथम प्रस्थापित गणपती ट्रस्ट – विंचूरकर वाडा (द्वितीय). काल्पनिक देखावे – ग्राहक पेठ गणेशोत्सव. वैज्ञानिक देखावे – शहीद भगतसिंग चौक मित्र मंडळ (प्रथम), श्री गजानन मित्र मंडळ तुळशीबाग (द्वितीय).

७) श्री गणेशोत्सव विशेष पारितोषिक :- अरण्येश्वर मित्र मंडळ, सेवा मित्र मंडळ, साईनाथ मंडळ ट्रस्ट, हिंद तरुण मंडळ ट्रस्ट (जय गणेश भूषण पुरस्कार प्राप्त मंडळे).

८) महोत्सवी वर्ष असलेली गणेश मंडळे :- पृथ्वीराज सेवा मंडळ ट्रस्ट, बनकर तालीम संघ (७५ वर्षे), आराधना स्पोर्टस क्लब ट्रस्ट, शिवशक्ती मित्र मंडळ, विकास तरुण मंडळ, आझाद मित्र मंडळ (५० वर्षे).

९) शैक्षणिक क्षेत्रात विशेष कार्य करणारी मंडळे :- ओम मित्र मंडळ, श्री पोटसुळ्या मारुती मंडळ, समाज विकास मंडळ व बाल मित्र मंडळ :- अथर्व बाल मित्र मंडळ, गुरुवार पेठ.

१०) शालेय विभाग (पुणे शहर परिसर) :- कामायनी विद्यामंदिर (प्रथम), बालकल्याण संस्था औंध रोड (द्वितीय), न्यू इंग्लिश मिडियम स्कूल शनिवार पेठ (तृतीय), न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड, नू.म.वि.प्रशाला बाजीराव रोड (उत्तेजनार्थ).

Spread the love