Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

‘श्री व सौ’ आणि ‌‘सप्रेम’ अंतर्गत गायन, वादन मैफल

पुणे : भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालयातर्फे ‌‘श्री व सौ’ आणि ‌‘सप्रेम’ हे दोन अभिनव उपक्रम हाती घेण्यात आले असून त्या अंतर्गत संवादिनी, तबला वादन आणि गायन मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे यांनी दिली.

सांगीतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या दाम्पत्याचे ‌‘श्री व सौ’ उपक्रमाअतंर्गत तर ‌‘सप्रेम’ अर्थात संवादिनी प्रेमी मंडळ या उपक्रमाअंतर्गत कलाकारांचे सादरीकरण होणार आहे. गुरुवार, दि. 3 ऑगस्ट रोजी सुयोग कुंडलकर यांचे एकल संवादिनी वादन होणार असून त्यांना भरत कामत तबला साथ करणार आहेत. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आरती कुंडलकर यांचे गायन होणार असून त्यांना सुयोग कुंडलकर (संवादिनी), संजय देशपांडे (तबला) साथ करणार आहेत.

शुक्रवार, दि. 4 ऑगस्ट रोजी श्रीराम हसबनीस यांचे एकल संवादिनी वादन होणार असून त्यांना प्रशांत पांडव तबला साथ करणार आहेत. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात संजीवनी हसबनीस यांचे एकल तबला वादन होणार असून त्यांना अमेय बिच्चू लेहरा साथ करणार आहेत.

गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास वर्षा व संजय चितळे (चितळे बंधू मिठाईवाले) तर शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास रोहिणी व श्रीकांत कुबेर (पु. ना. गाडगीळ ॲण्ड सन्स) यांची विशेष उपस्थिती असणार आहे. दोनही दिवस कार्यक्रम गांधर्व महाविद्यालयाच्या विष्णू विनायक स्वरमंदिरात सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आले आहेत.
समवेत फोटो : आरती कुंडलकर, सुयोग कुंडलकर, श्रीराम हसबनीस, संजीवनी हसबनीस
प्रति,

मा. संपादक
गांधर्व महाविद्यालयातर्फे ‌‘श्री व सौ’ आणि ‌‘सप्रेम’ हे दोन अभिनव उपक्रम हाती घेण्यात आले असून त्या अंतर्गत संवादिनी, तबला वादन आणि गायन मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. या वृत्तास प्रसिद्धी द्यावी ही विनंती.
पंडित प्रमोद मराठे, प्राचार्य, गांधर्व महाविद्यालय

Spread the love