Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

श्री भवानी माताजी जैन ट्रस्टच्या वतीने आदर्श माता आणि लिटल मास्टर पुरस्कार सोहळा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न

पुणे :श्री भवानी माताजी जैन ट्रस्टच्या वतीने आदर्श माता आणि लिटल मास्टर पुरस्कार सोहळा संपन्न झाला
आदर्श माता पुरस्कार पिंपरी -चिंचवड येथील सौ.सरलाबाई पोपटलालजी नाहर व औरंगाबाद येथील श्रीमती विमल ताई बाबूलालजी नाहर यांना देण्यात आला
याप्रसंगी कुमारी देशना आदित्य नाहर हिला विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

कुमारी देशना आदित्य नाहर हिने वीस कारच्या खालून स्केटिंग करीत विश्वविक्रमी फक्त 13 .74 सेकंदात पूर्ण केली
याप्रसंगी बोलताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की श्री भवानी माताजी जैन ट्रस्टच्या वतीने आदर्श माता पुरस्कार व लिटल मास्टर विशेष पुरस्कार दिले ही बाब नक्कीच अभिमानास्पद आहे
यावेळी कुमारी देशना आदित्य नाहर हिचे त्यांनी कौतुक देखील केलं

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील,प्रमुख अतिथी प्रकाश रसिकलालजी धारीवल ,श्री भवानी माता जैन ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष राजेश नाहर ,कोषाध्यक्ष नगरशेठ रसिकलाल नाहर ,सचिव आनंद आर. नाहर व मोठ्या प्रमाणावर मान्यवर उपस्थित होते

Spread the love