Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

शंकराचार्य उद्द्यानाचा होणार कायापालट….

मा.नगरसेवक श्री सुनिल पाटील यांच्या प्रयत्नाने नेरूळ सेक्टर २१ मधील जगद्गुरू शंकराचार्य उद्द्यानातील दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ आमदार सौ.मंदाताई म्हात्रे,मा.सभागृह नेते श्री.रविंद्र इथापे,मा.नगरसेविका सौ सुरेखा इथापे,मा.नगरसेविका सौ.सरस्वती पाटील, प्रजापिता ब्रम्हाकुमारीच्या निर्मलादिदी यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
याप्रसंगी सौ.मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की,या उद्यानात व बाजुच्याही राॅक गार्डन उद्यानात सुधारणा करण्यासाठी श्री सुनिल पाटील यांनी व रविंद्र इथापे यांनी पाठपुरावा करून हि कामे मार्गी लावली असुन या परिसरात वंडर्सपार्क, सायन्स सेंटर सारखे महत्त्वपूर्ण उपक्रम रविंद्र इथापे यांनी नागरिकांसाठी आणले असल्याने नेरूळमधील जनता त्यांना कधीच विसरणार नाही.
याप्रसंगी श्री.रविंद्र इथापे यांनी सांगितले की सेक्टर २१ मध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून आतापर्यंत २८ कोटीची कामे या ठिकाणी झाली असुन काही अज्ञानी लोक २५ वर्षात एक रुपयाचे काम झाले नाही असे सांगतात. सुनिल पाटील यांच्या माध्यमातून या सेक्टर २१,२३ व दारावे गाव परिसरात व आम्ही सर्व नेरूळ परिसरात अनेक नागरिकांनी सांगितलेली विकास कामे यापुढेही करतच राहु. तसेच काही लोक आम्ही काढलेल्या व मंजुर केलेल्या कामांची निविदा निघाल्यावर एक पत्र आयुक्तांना देतात व आम्हीच काम केल्याचे बॅनर लावतात. पण “लेकिन पब्लिक सब जानती है” असे रविंद्र इथापे यांनी सांगितले.
यावेळेस मा.नगरसेवक श्री सुनिल पाटील यांनी केलेल्या कामाचा आढावा घेतला. तसेच शंकराचार्य उद्द्यानानंतर राॅक गार्डनची काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी भाजपा तालुकाउपाध्यक्ष श्री अतुल पांडे,श्री भालचंद्र माने, वाॅर्ड क्र १०० चे अध्यक्ष श्री रवि डेरे,श्री रामप्रसाद तिवारी,श्री बन्सल व जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love