Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांना
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

मुल्याधिष्ठित राजकारण करणारा
आदर्श लोकप्रतिनिधी हरपला

राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांचा
मार्गदर्शक दीपस्तंभ ढासळला

महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक चळवळीचं
ध्येयनिष्ठ, सुसंस्कृत नेतृत्वं काळाच्या पडद्याआड

महाराष्ट्रानं सद्गगुणी सुपुत्र गमावला

मुंबई, दि. 30 :- “ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांनी अर्ध्या शतकाहून अधिकच्या प्रदीर्घ संसदीय कारकिर्दीत ध्येयनिष्ठा, पक्षनिष्ठा कायम जपली.

महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक चळवळीला सुसंस्कृत चेहरा दिला. राजकारणाला नैतिक अधिष्ठान दिलं.

महाराष्ट्राचा पुरोगामी विचार पुढे नेण्याचं काम त्यांनी केलं. त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांनी महाराष्ट्र विधीमंडळाचा गौरव वाढवला.

गणपतराव आबांच्या निधनानं मुल्याधिष्ठित राजकारण करणारा आदर्श लोकप्रतिनिधी हरपला आहे. राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांचा मार्गदर्शक दीपस्तंभ ढासळला आहे.

महाराष्ट्रानं सद्गुणी सुपुत्र गमावला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातलं अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून गणपतराव आबा कायम स्मरणात राहतील.

मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे स्मरण करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

Spread the love