Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

संतोष जाधवला गुजराथमधून ताब्यात घेतले

मंचर येथील मोका मधील फरार आरोपी संतोष जाधव याचा पंजाब मधील प्रसिद्ध गायक सिद्धू मुसावाला हत्याकांडांत सहभाग असल्याची माहिती प्रसार माध्यमातून जाहीर झाली होती.

पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पुणे ग्रामीण पोलिसांनी ७ दिवसांच्या अथक परिश्रमाने संतोषला गुजराथमधून ताब्यात घेतले.

अपर पोलीस महासंचालक ( कायदा व सुव्यवस्था) मा. कुलवंतकुमार सरंगल यांनी त्याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मा . मनोज लोहिया उपस्थित होते.

मा. पोलीस महासंचालक यांनी पुणे ग्रामीण पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

Spread the love