Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

संभाजी ब्रिगेडचे रौप्यमहोत्सवी अधिवेशन – ‘अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा, अवघा मुलुख आपला’

‘नवी दिशा, नवा विचार’ देण्याचा आपला प्रयत्न आहे म्हणूनच एक संकल्पना डोक्यात आली ती म्हणजे ज्या हातांनी संघर्ष केलाय किंवा वेळ प्रसंगी आंदोलने केलीत त्याच हातांनी पैसा कमावला पाहिजे व शाश्वत विकासही केला पाहिजे.

‘झाकली मूठ सव्वा लाखाची, करलो दुनिया मुठ्ठी में, जिंकूया दाही दिशा’ असे विविध विचार रुजवून आता आपण जगाशी स्पर्धा केली पाहिजे. जग फिरतं ते चलनाभोवती, त्यामुळे ‘अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा, अवघा मुलुख आपला’ या तत्वानुसार आपला विस्तार केला पाहिजे.

थोडक्यात काय तर, सांस्कृतिक व पुरोगामी विचारांचं काम करत असताना ‘बहुजनांशी संवाद साधत’ आपण आता ‘आरक्षणाकडून अर्थकारणाकडे’ जात आहोत. हीच संकल्पना डोक्यात ठेवून आपल्या रौप्यमहोत्सवी अधिवेशनाची ‘थीम’ डिझाईन केलीय.

संभाजी ब्रिगेडची २५ वर्ष परिवर्तनाची पूर्ण होत आहेत म्हणूनच त्याचा उत्सव जोरदार झालाच पाहिजे शिवाय भविष्याचा वेध देखील घेतला पाहिजे…! चला तर मग मोठ्या संख्येने सामील व्हा..!!
जय जिजाऊ, जय शिवराय!
– प्रविण गायकवाड
प्रदेशाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड

Spread the love