Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

सेफ्टी रिसर्च फाउंडेशन तर्फे गो यलो रोड सुरक्षा जागरूकता बाबत पुण्यात कार्यक्रम

पुणे -सेफ्टी रिसर्च फाउंडेशन तर्फे गो यलो रोड सुरक्षा जागरूकता बाबत पुण्यात प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन २५ व २६ फेब्रवारी 2022 रोजी करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे आयोजन सेफ्टी रिसर्च फाउंडेशनचे रणधीर राठोड यांनी आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे संयोजन अल्ताफ पिरजादे यांनी केले होते. या वाहतूक जनजागृती मोहिमेची सुरुवात पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या सिग्नल पासून, विमान नगर चौक,बालगंधर्व चौक व गुडलक चौक येथे करण्यात आले होते.

याप्रसंगी चतुशृंगी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रकाश मासळकर,पोलीस निरीक्षक मोहन जाधव, विमाननगरचे पोलीस निरीक्षक अजित लकडे, डेक्कन पोलिस स्टेशनचे वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार निलेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब झरेकर,पोलिस उपनिरीक्षक संदीप जगताप ,मिसेस युनिव्हर्स ऑस्ट्रेलिया व लाईफ कोच डॉ.प्रचिती पुंडे, सेफ्टी रिसर्च फाऊंडेशनचे रणधीर राठोड, अल्ताफ पिरजादे , शिरीष ढाले ,प्रशांत निकम, विवेककुमार तायडे ,सीताराम मोरे उपस्थित होते.या वाहतूक जनजागृती उपक्रमात सोनिया गोळे ,रूपाली बिडकर , धनश्री बीडकर,विवेक काटकर, सुनंदा काटकर, हर्षल वाघमारे या स्वयंसेवकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.

सेफ्टी रिसर्च फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी सिग्नल वरील वाहकांना बॅच देण्यात आले. येलो गो कार्यक्रमाची संकल्पना लोकांमध्ये रस्ता सुरक्षा नियम व नवीन वाहतूक नियम उल्लंघन नियमांबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे.

पिवळा रंग रस्ता सुरक्षेबाबतच्या माझ्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे आणि सर्व वाहतूक सुरक्षा नियमांचे पालन करतो.

रस्ता सुरक्षा , याचा अर्थ सुरक्षित वाहन चालवणे, सुरक्षेच्या नियमांचे पालन करणे, हेल्मेट वापरणे ,सीट बेल्ट वापरणे , सिग्नल उडी न मारणे , स्टॉप लाईनचे अनुसरण करणे ,ओव्हर स्पीडिंग नाही, मद्यपान करू नका, वाहन चालवू नका , वाहन चालवताना फोनचा वापर करू नका. असा संदेश दिला आहे.
हा बॅच धारण करून मी रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करण्याची माझी वचनबद्धता देतो. अशाप्रकारे प्रबोधन करण्यात आले.

Spread the love