Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

रुपाली पाटील ठोंबरे यांचा अखेर राष्ट्रवादीत प्रवेश…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी पक्षातील सर्व पदांचा व पक्षाच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे.त्यांच्याकडे मनसेच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी होती.

पक्षांतर्गत वादामुळे त्यांनी मनसेला रामराम ठोकला आहे. राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी पक्षाला रामराम ठोकल्यामुळे आणि ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पुणे शहरात मोठे खिंडार पडले आहे.

काल त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मी थोड्या दिवसात माझी भूमिका स्पष्ट करणार असे सांगितले होते. अखेर आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love