पुणे : रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईजच्या अध्यक्षपदी डॉ. सिमरन जेठवानी, तर उपाध्यक्षपदी पल्लवी कौशिक यांची निवड झाली आहे.
सचिवपदी एस. एम. खान, खजिनदारपदी प्रशांत कोरेगांवकर, सहसचिवपदी गौरव जेठवानी, तर सहखजिनदारपदी सचिन तलरेजा यांची नियुक्ती झाली आहे.

मानद सल्लागारपदी पॉलिकॅब वायरचे इंदर जयसिंघानी, ‘वेकफील्ड’च्या संचालिका सीमा मल्होत्रा नियुक्त करण्यात आले आहे.
२०२१-२२ या कालावधीसाठी ही कार्यकारिणी असणार आहे.
रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१३१चे प्रांतपाल पंकज शहा व सहायक प्रांतपाल सीए महेश भागवत यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला.

याचबरोबर सहा युवक, सहा महिला आणि ११ प्रथितयश अशा २३ जणांना नव्याने सभासदत्व बहाल करण्यात आले.
रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईजने आजवर अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत.
आगामी वर्षातही पर्यावरण, महिला सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य, रोजगार निर्मिती अशा विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

तसेच कोरोनाग्रस्त आणि पूरग्रस्तांसाठी मदत पुरविण्यात येणार असून, त्याचाच भाग म्हणून महाडमधील दुर्घटनाग्रस्तांना रोटरी इंटरनॅशनलच्या माध्यमातून मदतनिधी पाठवला असल्याचे डॉ. सिमरन जेठवानी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरव जेठवानी यांनी केले. आभार पल्लवी कौशिक यांनी मानले.
जाहिरात / प्रसिद्धिसाठी
संपर्क: शिवाजी मा. हुलवळे
संपादक: छत्रपती मिडीया ग्रुप ✒️
पत्रकार – छायाचित्रकार
9422306342 / 8087990343
More Stories
अधिकारांसोबत कर्तव्येही महत्वाची
न्या.अरुणा फरसवाणी; एमआयटी एडीटी विद्यापीठात संविधान दिन
“पर्वती” चे वैभव टिकविण्यासाठी सर्वतोपरी मदतीचे चंद्रकांतदादा पाटील यांचे वचन
जनतेनी केलेली भाऊबीज हा अनमोल ठेवा -अग्निशमन दल प्रमुख देवेंद्र पोटफोडे