Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

अधिकारांसोबत कर्तव्येही महत्वाची
न्या.अरुणा फरसवाणी; एमआयटी एडीटी विद्यापीठात संविधान दिन 

पुणेः ‘आपल्या भारतीय संविधानाने मिळवून दिलेल्या अधिकारांचा उपभोग घेत असताना, या अधिकारांसोबत काही कर्तव्येही येतात, ज्यांचे देशाच्या प्रत्येक नागरिकाने पालन करणे, अत्यंत महत्वाचे आहे. तसेच आपल्या अधिकारांचा उपभोग घेताना आपण देशाचे सार्वभौमत्व, अखंडता आणि एकता यांस बाधा पोचणार नाही याची काळीज घेतली पाहिजे,’ असे मत कौटुंबिक न्यायालय, ठाणेच्या माजी प्रधान न्यायमूर्ती अरुणा फरसवाणी यांनी व्यक्त केले. 

त्या एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणेच्या स्कुल ऑफ लाॅ व स्कुल ऑफ भारतीय प्रशासकीय सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संविधान दिनाच्या कार्यक्रमात बोलत होत्या. याप्रसंगी, ‘स्कुल ऑफ लाॅ’ च्या अधिष्ठाता डाॅ.सपना देव, डाॅ.सुजित धर्मपात्रे आदी आदी उपस्थित होते. 

न्या. फरसवाणी यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधताना, त्यांच्या लिव्ह इन रिलेशनशिप, वाढलेल्या घटस्फोटांचे प्रमाण, सोशल मीडिया कायदे यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच, याप्रसंगी न्या. फरवाणी यांच्या हस्ते “घटनात्मक कायदा अभ्यास आणि संशोधन केंद्र” चे उद्घाटन करण्यात आले.

या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी कायद्याविषयीची कल्पकता वाढविणाऱ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. 
विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड, प्रा.डाॅ.सुनीता कराड, कुलसचिव डाॅ. महेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली व  लाॅ व स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वी ठरला.

Spread the love