Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

भगवानराव वैराट यांना वीर पुरस्कार प्रदानहस्ते रतनलाल सोनग्रा, डॉ. विश्वनाथ कराड, कुमार सप्तर्षी

आचार्य रतनलाल सोनग्रा लिखित आर. के. सोनग्रा प्रकाशन, नीहारा प्रकाशन आयोजित विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर मैत्रेय बुध्द ग्रंथ प्रकाशन सोहळा व दहा पारमिता सन्मान सोहळा नुकताच पार पडला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ. विश्वनाथ कराड, डॉ. कुमार सप्तर्षी व रतनलाल सोनग्रा आदी मान्यवर उपस्थित होते.

रतनलाल सोनग्रा त्यांचे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, की बाबासाहेबांचे समाजातील योगदान फार मोठे होते. त्यांनी एकाच वेळी पाच लाख लोकांना दीक्षा देवून त्यांचे परिवर्तन केले. अशी जगात एकमेव घटना घडली आहे. भगवानराव वैराट यांना वीर पुरस्कार देताना आम्हाला आनंद होत आहे.
भगवानराव यांचे समाजासाठी कार्य मोलाचे आहे.

डॉ. कुमार सप्तर्षी, थोर गांधीवादी विचारवंत म्हणाले की माणसाला माणसाशी जोडतो तो धर्म असतो आणि माणसाला माणसापासून जो तोडतो तो अधर्म असतो. समाजात काम करताना नावाप्रमाणेच भगवान असलेले भगवानराव यांचे गोरगरिबांसाठी केलेले काम वाखाणण्याजोगे आहे. कोणत्याही माणसाची जात धर्म न पाहता त्यांनी काम केले आहे.

प्रा. डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त वैराट यांना वीर पुरस्काराने गौरविण्यात आले.गेल्या ४ दशकापासून ते अविरहितपणे समाजात काम करत आहेत. सामान्य घरातून, दुःखातून आलेल्या वैराट यांनी अनेक लोकांचे आयुष्य उजळून टाकले. त्यांनी त्यांच्या जीवनात त्यांनी खूप मोठा संघर्ष केला आहे.

प्रास्ताविक व स्वागतपर भाषण स्नेहसुधा कुलकर्णी यांनी केले तर सूत्रसंचालन दीपक म्हस्के यांनी केले.

Spread the love