Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

राजीव गांधी ई लर्निंग स्कूलसारख्या शाळा महाराष्ट्रभर व्हाव्यात

नाना पटोले माजी प्रधानमंत्री स्व. राजीव गांधी यांची जयंती व राजीव गांधी इ लर्निंग स्कूलच्या दशकपूर्तीनिमित्त शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आज राजीव गांधी इ लर्निंग स्कूल येथे आयोजित करण्यात आला होता.

यावेळी अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. नाना पटोले,जेष्ठ गांधीवादी,विचारवंत उल्हास पवार, शरद रणपिसे,आमदार बाळासाहेब शिवरकर,अमीर शेख, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

स्व. राजीव गांधी यांच्या अर्ध पुतळ्यास त्यांनी पुष्पहार अर्पण करून शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला.

महानगरपालिकेच्या शाळेत सामन्यांची मुले शिक्षण घेतात, राजीवजी गांधी प्रधानमंत्री झाले त्यावेळी त्यांनी विचार केला की,देशातील सर्व राज्यांमध्ये महानगरपालिकेच्या व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सामान्यांच्या मुलांसाठी शिक्षणाची चांगली व्यवस्था केलीच पाहिजे, आबा बागुल यांनी 10 वर्षापूर्वी ई लर्निंग स्कूल सुरू करून तिला राजीव गांधींचे नाव दिले व त्यामध्ये सामान्यांच्या व गरीब मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण दिले जाते.

असा अभिनव प्रयत्न त्यांनी केला त्यांचे कौतुक आहे. एका शास्त्रज्ञाने चांगले सांगितले आहे. देवाने सर्वांना बुद्धी सारखीच दिली आहे.

परंतु कोणी त्याचा वापर कसा करतो यावर सगळे अवलंबून असते.

त्यासाठी चांगली व्यवस्था निर्माण केल्या पाहिजे आबा बागूल यांनी पुढाकार घेऊन ही शाळा सुरू केली हे महत्वाचे आहे.

अश्या शाळा महाराष्ट्रातच काय देशात व्हायला पाहिजेत यातून चांगले नागरिक घडतील व राजीव गांधींचे स्वप्न पूर्ण होईल.

आबा बागुल म्हणाले की, भारतीय संगणक युगाचे निर्माते राजीव गांधी यांच्या दुरदृष्टीतून प्रेरणा घेऊन 10 वर्षांपूर्वी राजीव गांधी इ लर्निंग स्कूल सुरू केली त्याची दशकपूर्ती होताना अनेक विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत आहे.

आयआयटी,इंजिनिर,डॉक्टर होत आहेत. तसेच नासा सारख्या जगप्रसिद्ध संस्थेत काम करत आहेत ही अभिमानाची बाब आहे.

यातून राजीव गांधी यांचे शिक्षणाची गंगा तळागाळातील मुलांना मिळत आहे त्यातूनच राजीव गांधींचे स्वप्न पूर्ण होत आहे. याचा अभिमान आहे.

शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रथिनिक स्वरूपात करण्यात आला त्यामध्ये नंदन खाटपे, प्राची जगदाळे,प्रणव जागडे, प्रियांका ढमढेरे,जयदत्त सांडभोर यांचा सत्कार करण्यात आला.

तदनंतर विलासराव देशमुख तारांगणाला नाना पटोले यांनी सदिच्छा भेट देऊन विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तारांगणातील शो पाहून त्याचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित बागुल यांनी केले आभार सागर आरोळे यांनी मानले याप्रसंगी नंदकुमार बानगुडे , अभिषेक बागुल, द स पोळेकर, इम्तियाज तांबोळी , धनंजय कांबळे, महेश ढवळे ,तेजस बागुल, विकास मनोरे, विजय सकट, बाबालाल पोळके, ओंकार उपाध्ये, सुरज सोनवणे, उमाकांत गायकवाड,विश्वास दिघे, गौरव साळवे, तुषार पवार, ऋषिकेश मोडवे, राहुल तौर, सौरभ ढेबे, इत्यादी उपस्थित होते

जाहिरात / प्रसिद्धिसाठी
संपर्क: शिवाजी मा. हुलवळे
संपादक: छत्रपती मिडीया ग्रुप ✒️
पत्रकार – छायाचित्रकार
9422306342 / 8087990343

Spread the love