Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

राजर्षी शाहू महाराजांचे पुत्र श्री छत्रपती राजाराम महाराजांची आज जयंती !

कोल्हापूरमध्ये शालिनी पॅलेस, बी. टी. काॅलेज, शिवाजी टेक्निकल स्कूल, ट्रेझरी, राधाबाई बिल्डींग (कोर्ट), कलेक्टर अॉफीस, साईक्स लाॅ काॅलेज अशा खूप देखण्या वास्तू आहेत. 

छत्रपती शाहू महाराज, आईसाहेब महाराज, प्रिन्स शिवाजी यांची पूर्णाकृती स्मारके आहेत.

  ह्या वास्तू, ह्या मूर्ती कोणी उभे केले तर, या साऱ्यांत छत्रपती राजाराम महाराजांचा खूप मोठा वाटा आहे.

केवळ वास्तूच नव्हे, तर १९२२ ते १९४० अशी एकूण अठरा वर्षे त्यांनी कोल्हापूर राज्याचा कारभार पाहिला.

त्यांच्या काळात रंकाळा तलावाच्या काठावर शालिनी पॅलेस उभा राहिला. छत्रपती शाहू महाराजांनी सुरू केलेले राधानगरी धरणाचे काम त्यांनी पूर्णत्त्वास नेले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पुर्णाकृती पुतळा पुणे येथे छत्रपती राजाराम महाराजांनीच उभारला.

शेतकी कॉलेज सुरू केले. याशिवाय कोल्हापूर बँकेची त्यांनी स्थापना केली.

लक्ष्मीपुरी व्यापारपेठेची उभारणी केली. कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रांच्या विकासाला चालना दिली.

कोल्हापूरच्या विमानतळावरून पहिल्या विमानाने अवकाशात भरारी राजाराम महाराजांच्या कारकिर्दीतच घेतली.

राजा म्हणजे राजवाडा, ऐषोरामी यात गुंतून न राहता कोल्हापूरला आधुनिकतेचा नवा मार्ग दाखविणाऱ्या क्षत्रियकुलावतंस श्री राजाराम छत्रपती महाराजांस जयंतीदिनी त्रिवार अभिवादन !

Spread the love