Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मारकाच्या नुतनीकरणाचा शब्द प्रशांतदादा जगताप यांनी दिला.

आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त शाहू महाविद्यालय येथे भेट दिली असता राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याच्या स्मारकाच्या दुरावस्थेबद्दल तेथील कर्मचाऱ्यांनी माझ्यासोबत चर्चा केली.

येत्या एका वर्षात पुतळ्याच्या मूळ रचनेस धक्का न लावता संपूर्ण स्मारकाचे नूतनीकरण व मजबुतीकरण केले जाईल असा शब्द मी यावेळी दिला यासाठी संपूर्ण स्मारकाचे नूतनीकरण व मजबुतीकरण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे केले जाईल असा शब्द मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शहराध्यक्ष या नात्याने पुणेकरांना या वेळी दिला.

तसेच येत्या काही दिवसांत या कामाचा आदरणीय उपमुख्यमंत्री ना.अजितदादांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात येईल व पुढच्या 26 जुन ला आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या शुभहस्ते एका दिमाखदार सोहळ्यात या स्मारकाचे लोकार्पण करण्यात येईल,असा विश्वास मी समस्त पुणेकरांसमोर व्यक्त केला.

त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नुतन पुणे शहर मध्यवर्ती कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शहर अध्यक्ष व इतर मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

******************************

जाहिरात / प्रसिद्धिसाठी

संपर्क: शिवाजी मा. हुलवळे

संपादक: छत्रपती मिडीया ग्रुप✒️

पत्रकार-छायाचित्रकार

📱 9422306342/

8087990343

Spread the love