Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आबा बागुल  यांच्यातर्फे तर्फे नागरिकांना मोफत छत्री वाटप

पुणे: कोरोनाची सद्यस्थिती आणि लोकांचे होत असलेले हाल या भावनेतून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो काँग्रेसचे गटनेते नगरसेवक आबा बागुल यांच्या वतीने नागरिकांना राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त ऐन पावसाळ्यात छत्रीचे मोफत वाटप करण्यात आले यावेळी बोलताना नगरसेवक आबा बागूल म्हणाले की समाजाला आपण काहीतरी देणं लागतो आणि करुणा ची सद्यस्थिती पाहता लोकांची अतिशय बिकट अवस्था झाली आहे प्रत्येकाने जर आपल्या शेजारच्या ला थोडीशी मदत केली तर माणुसकीची भावना जपली जाईल व यातूनच एक चांगला समाज निर्माण होण्याचे काम प्रत्येकाच्या हातून होऊन त्याला आपण काहीतरी चांगले केले याचे आनंद होईल.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा आज वाढदिवस असल्या कारणाने आज छत्रीचा वाटप कार्यक्रम घेण्यात येत आहे यावेळी बोलताना अमित बागुल म्हणाले की कोणाच्या काळात समाजासाठी अनेक कामे केली आहेत सध्या पाऊस चालू झाला असल्याने नागरिकांची गैरसोय लक्षात घेता छत्रीचा वाटप कार्यक्रम घेण्यात येत आहे या कार्यक्रमाला काँग्रेसचे रमेश बागवे ,अभय  छाजेड, इंदिरा आहिरे व काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उपस्थिती लावली. अनाथ मुलांच्या हस्ते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला
पहिल्या टाळेबंदीपासून आतापर्यंत रेशन वाटप ,मास्क,धान्य वाटप ,रिक्षाचालकाना इंधन व नागरिकाना ,गरजूंना आम्ही मदत केली या पुढेही
मदत करणार आहोत असे अमित बागुल म्हणाले.


रमेश बागवे म्हणाले पुणे शहरात हा फक्त एकच प्रभाग आहे जीते कोरोना काळात या प्रभागातील गरजू नागरिकांना जास्तीत जास्त मदत आबा बागुल यांनी केली आहे   खरंतर महापालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे त्यांनी  पुण्यातील सगळ्या प्रभागात गरजू लोकांना जास्तीत जास्त मदत केली पाहिजे पण तसे होताना दिसत नाही काँग्रेस पक्ष आबा बागुल यांचे काम बघून नक्कीच  पक्षात मोठी संधी देईल असे बागवे म्हणाले.

अभय छाजेड म्हणाले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आधी सांगितले होते की मोठ काहीतरी संकट येणार आहे पण आरोग्यमंत्र्यांनी याकडे दुर्लक्ष केले आख्या भारतात लसीकरण व्हावे मी राहुल गांधी यांची पहिली मागणी होती असे छाजेड म्हणाले. प्रभागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला हजेरी लावली व छत्री घेतली.

Spread the love