Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

पुण्यातील डॉ. अंजली मेंढे जगतापने जिंकला मिसेस इंडिया अर्थ २०२१ चा खिताब

डॉ. अंजलीने राष्ट्रीय स्तरावर केले भारताचे प्रतिनिधित्व

जगभरातील ३० स्पर्धकांनी घेतला होता सहभाग. भारत, महाराष्ट्र, पुणे, मंगळवार २८ डिसेंबर २०२१: मिसेस इंडिया अर्थ पेजंटच्या आयोजकांनी नवी दिल्ली येथे नुकताच आपला ग्रँड फिनाले आयोजित केला होता. सौंदर्य, प्रतिभा, बुद्धिमत्ता आणि करुणा आदि विविध गुणांनी संप्पन अश्या विवाहित भारतीय महिलांना विशेष ओळख मिळवुण देण्यासाठी आयोजित अशी ही एक वार्षिक स्पर्धा होती.

या स्पर्धेमध्ये पुण्यातील डॉ. अंजली मेंढे जगतापने मिसेस इंडिया अर्थ २०२१ हा खिताब जिंकला. या मेगा इव्हेंटमध्ये जगभरातील विविध देश आणि शहरांमधील तीस स्पर्धक आणि सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता, जेथे त्यांनी आपली प्रतिभा, संस्कृती, कला, शैक्षणिक पार्श्वभूमी दर्शवत आपल्या देशांचे प्रतिनिधित्व केले.

पुण्यातील डॉ. अंजली जगताप, व्यवसायाने दंतचिकित्सक असुनच त्या एक जबाबदार मुलगी, पत्नी आणि सूनही आहेत. त्यांनी या वर्षीचा मिसेस इंडिया अर्थ २०२१ खिताब (RUBY) जिंकला. याचसोबत त्यांना मिसेस ब्युटीफुल सोल टायटल देखील बहल करण्यात आले. पुढील काही वर्षांत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्या भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. यापूर्वी त्यांनी इंडियाज नेक्स्ट डिजिटल दिवा २०२१ हे विजेतेपद पटकावले असुन त्यांना सर्वोत्कृष्ट मॉडेल म्हणून देखील गौरविण्यात आले आहे.

या दिवा 28 वर्षांच्या आणि १६३ सेमी उंच आहेत. त्यांनी बीडीएस, एमडीएस मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे आणि त्या पुण्यातील दंतचिकित्सक आहेत. अश्या स्पर्धेमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे त्यांचे स्वप्न होते. मिसेस इंडिया अर्थ २०२१ चे शीर्षक त्यांना आजही स्वप्नासारखे वाटते. आयोजक आणि परिक्षकांनी त्यांच्यातील क्षमता पाहिली व त्यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना विजेता घोषित केले ज्यासाठी त्या खुप आनंदी आहेत.

अश्या स्पर्धांमध्ये सहभागी होणे ही काही छोट गोष्ट नाही त्यासाठी 3 महिन्यांहून अधिक कालावधीची तयारी आवश्यक होती, त्यासाठी अंजली मानसिक, शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या तयारी करत होत्या. त्यांनी घर आणि काम संभाळुण या स्पर्धेची तयारी केली. अंजली स्वतःला एक निश्चिंत आनंदी, सकारात्मक आणि उत्कट स्त्री समजते, जी जीवनातील नवीन आव्हाने स्वीकारण्यास तयार आहे आणि मिसेस इंडिया अर्थ २०२१ प्लॅटफॉर्म त्यापैकी एक होते.

अंजली म्हणातात की त्या कृतज्ञ आहेत की त्यांच्या आयुष्यात असे लोक आहेत ज्यांनी त्यांना नेहमीच पाठिंबा दिला आणि पुढे जाण्यासाठी प्रेरित केले, विशेषतः त्यांचे आई-वडील, पती आणि सासरचे लोक. विशेषतः, त्या यशाचे श्रेय त्यांच्या स्पर्धा प्रशिक्षीक रितिका रामत्री (द टियारा पेजेंट ट्रेनिंग स्टुडिओच्या संस्थापक ) यांना देतात. ज्यांनी त्यांच्यावर खूप मेहनत घेतली आणि प्रशिक्षण दिले.

हा खिताब मिळविल्यानंतर त्यांना अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून काम करण्याची इच्छा आहे. अंजली या एक मजबूत, आत्मविश्वासू आणि सुंदर स्त्री आहेत, ज्यांचा असा विश्वास आहे की ज्या तरुणींना ब्युटी क्वीन किंवा जीवनात काहीही बनण्याची इच्छा आहे त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे आणि कठोर परिश्रम करत राहिले पाहिजे कारण कठोर परिश्रम केल्यानेच शेवटी अपेक्षित फळ मिळते. त्यांनी जगाला दिलेला संदेश – “काहीही झाले तरी तुमची स्वप्ने सोडू नका, स्वतःवर विश्वास ठेवा आणि यश तुमचेच आहे.” त्यांनी देशभरातील मुली आणि महिलांना सर्व स्वरूपातील सौंदर्यच्या दृष्टीकोनासाठी प्रोत्साहित करायचे आहे.

Spread the love