Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

अबुधाबी येथे पुण्यातील ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्ट (क्लबला) जागतिक पुरस्कार

भारतातील सर्वोत्तम गोल्फ कोर्स Hotel सन्मान 2023 –
पुणे दि ——- पुण्यातील ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्टला प्रतिष्ठित असा जागतिक गोल्फ पुरस्कार नुकताच अबुधाबी येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला .

भारतातील सर्वोत्तम गोल्फ कोर्स रिसॉर्ट असा पुरस्कार 2023 चा विजेता म्हणून हा पुरस्कार दिला आहे. अशा प्रकारे आता गोल्फ पर्यटनातील उत्कृष्ट संस्था म्हणून ऑक्सफर्ड ला जगभर मान्यता मिळाली वर्ल्ड गोल्फ आसोसिएशन द्वारे (WGA ) दरवर्षी विविध पुरस्कार दिले जातात .जागतिक गोल्फ hotel पुरस्कार 2023 चा सन्मान यंदा पुण्याला मिळाला आहे .अशा प्रकारे ऑक्सफर्ड आता जगभरातील गोल्फ पर्यटनातील उत्कृष्ट संस्थांच्या समुदायाचा भाग आहे.

जगभरातील प्रवासी व्यावसायिक, मीडिया आणि ग्राहकांनी याला मत दिले होते, हा सन्मान ऑक्सफर्डच्या उत्कृष्टतेच्या वचनबद्धतेला ओळखतो. ऑक्सफर्ड संस्कृती आणि मिशन म्हणून आमचे लक्ष्य आमच्या ग्राहकांना सर्वात आनंदाचे क्षण आणि तणावमुक्त वातावरण देण्याचे आहे.

ऑक्सफर्डने विविध सामाजिक उपक्रमांचाही गौरव केला आहे जसे की माती वाचवणे, सेंद्रिय प्रक्रिया उत्तम प्रकारे करणे, समाजासाठी बांधिलकी म्हणून दुर्लक्षित गावांचा विकास करणे असे विविध उपक्रम राबविले जात असतात अशी माहिती ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्टचे संचालक अनिल सेवलेकर यांनी सांगितली आहे .

Spread the love