Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

पुण्याचे माननीय महापालिका आयुक्त, श्री विक्रम कुमार यांनी एआयच्या मदतीने पुण्याला एक स्मार्ट शहर बनवणार

एआयच्या मदतीने पुण्याला 15 वॉर्डांमधून अधिक कर गोळा करण्याची आणि डिजिटायझेशन इंडिया उपक्रमाला चालना देण्याची अपेक्षा आहे

१४ ऑक्टोबर, २०२१, पुणे: एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) सोल्यूशन्स वापरून पुण्याला एक स्मार्ट शहर बनवण्याच्या दृष्टीकोनाबद्दलची माहिती देणारी पत्रकार परिषद आज आयोजित करण्यात आली होती.

यावेळी पुणे महानगरपालिका आयुक्त, श्री विक्रम कुमार, (आयएएस) यांनी एआय सोल्यूशन्स वापरून पुण्याला एक स्मार्ट शहर बनवण्याच्या दृष्टीकोन स्पष्ट केला.

पुणे महानगरपालिकेचे माननीय महापालिका आयुक्त, श्री विक्रम कुमार म्हणाले की पुणे शहर हे डिजीटायझेशनच्या मार्गावर चालले आहे.

आम्ही पुण्याला अधिक स्मार्ट शहर बनवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, उपग्रह प्रतिमा, आणि सहाय्यक सॉफ्टवेअर वापरत आहोत. कारण तंत्रज्ञानामुळे चुका होण्याची शक्यता मानवांच्या तुलनेत नगण्य आहे.

आम्ही प्रॉपर्टी टॅक्सची चोरी, अनधिकृत झोपडपट्ट्या आणि डंपिंग यार्ड यासारख्या बाबीं उपग्रह प्रतिमेद्वारे लक्ष ठेवत आहोत जे आम्हाला संपूर्ण शहराच्या नकाशावर निर्देशित करणे शक्य होईल.

आतापर्यंत, येरवडा येथील आमची परीक्षण यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. पुणे आणि नागरिकांच्या भल्यासाठी आम्हाला 15 वॉर्डांमधून अधिक कर संकलन होण्याची अपेक्षा आहे.”

माननीय महानगरपालिका आयुक्त यांचे म्हणणे मांडताना, डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त इस्टेट म्हणाले, “डेटा अॅनालिटिक्स, एआय, मशीन लर्निंग (एमएल), उपग्रह प्रतिमा आणि ई-गव्हर्नन्स वापरून, आम्ही नियमित मालमत्ता कर संकलन करण्यासाठी डेटा गोळा करत आहोत.. “

यावेळी मयुराक्षी दास, संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, इलेक्सिर एआय म्हणाल्या की, आम्ही डिजीटाईझ इंडिया उपक्रमाला चालना देण्यासाठी आणि स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पुणे महानगरपालिकेशी जोडले गेल्या बद्दल आणि माननीय महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असल्याबद्दल कृतज्ञ आहोत .

केंद्रीकृत आणि उपग्रह प्रतिमांसह, पुणे हे आपल्या नागरिकांच्या चांगल्या भविष्यासाठी डिजिटल सक्रिय, स्वच्छ आणि स्मार्ट शहर बनण्याच्या मार्गावर आहे. ही परिषद पुणे महानगरपालिकेत आयोजित करण्यात आली होती.

एलिक्सिर एआय बद्दल

एलिक्सिर एआय ही एक एआय-सक्षम तंत्रज्ञान सोल्यूशन फर्म आहे जी भारत सरकार/ महानगरपालिका/ भारतीय खाजगी कंपन्यांना परिवर्तनशील, भिन्न आणि मिशन-क्रिटिकल सोल्यूशन्स वितरित करण्यावर लक्ष केंद्रित करते.

अनेक दशकांचा जागतिक अनुभव आणि देशांतर्गत बाजारपेठांची माहिती मिळवून देणारे हे व्यासपीठ “भारतासाठी भारतामध्ये निर्मित!” आणि भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त विक्रेता आहे.

जाहिरात / प्रसिद्धिसाठी
संपर्क: शिवाजी मा. हुलवळे
संपादक: छत्रपती मिडीया ग्रुप ✒️
पत्रकार – छायाचित्रकार
9422306342 / 8087990343

Spread the love