Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

पुणेकरांच्या प्रेमाने मी भारावलो – संगीतकार आनंदजी

जगप्रसिद्ध संगीतकार आनंदजी यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त डॉ.विनय सहस्त्रबुध्दे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

पुणेकरांच्या चोखंदळपणाबद्दल आणि कला प्रेमाबद्दल मी खूप ऐकलं होतं पण आज या दर्दी पुणेकरांच्या आलोट प्रेमाने मी अक्षरशः भारावून गेलो आहे असे बोलता बोलता आनंदजी नावाचा संगीताचा आनंदजी गहिवरून गेला., डोळे भरून आले आणि त्यांचा स्वर कापरा झाला.

गायत्री व्हॉइस क्लिनिक च्या वतीने जग प्रसिद्ध संगीतकार कल्याणजी यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यासोबत वार्तालाप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ,याप्रसंगी त्यांच्या पत्नी शांताबेन यांनी त्यांना केक भरवताना ‘हर जीवन मे तुम मेरे ही बनना……. म्हणताच या जगप्रसिद्ध कलाकाराच्या मनाचा हळवा कोपरा भरून आला आणि त्याने सुद्धा …साथ सदियो पुराना है अपना …….या पंक्तीमध्ये त्यांना उत्तर दिलं.

या कार्यक्रमात कल्याणजी आनंदी जोडीच्या गेल्या पन्नास वर्षातील स्वरमयी प्रवासाबद्दल त्यांना विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.

सुरुवातीच्या काळात काम कसे मिळवले ,किती कमी पैशात काम करावे लागले , नागीन, जंजिर,मुकद्दर का सिकंदर या सारख्या चित्रपटां चे संगीत,रसिकांनी भरभरून दिलेले प्रेम या विषयी मन मोकळे केले .सुप्रसिद्ध मुलाखतकार मंगेश वाघमारे आणि सुधीर गाडगीळ यांनी त्यांची मुलाखत घेतली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आयसीसीआर , भारत सरकार चे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत मा. खासदार विनयजी सहस्त्रबुद्धे उपस्थित होते .त्यांनी मनोगत व्यक्त करताना आमच्यासारख्या अनेक रसिकांच्या जीवनामध्ये कल्याणजी आनंदजी यानी मांगल्याचे स्वर आणि सूर निर्माण करून करोडो लोकांचं आयुष्य स्वरमय केल्या चे प्रतिपादन केले.

कृष्ण सुंदर लॉन्स, डीपी रोड येथे कार्यक्रम संपन्न झाला .
कार्यक्रमाचे संयोजक स्वर तज्ञ डॉ.मिलिंद भोई यांनी कार्यक्रमाचे आयोजन मागची भूमिका स्पष्ट करताना या जगप्रसिद्ध कलाकाराच्या स्वरयात्रेबद्दल जाणून घेण्यासाठी व पुणेकरांच्या वतीने त्यांच्या स्वर सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती या प्रसंगी दिली.

शास्त्रीय गायक पं.सुहास व्यास,सर्जिकल स्ट्राईक स्टाईक चे शिल्पकार ले.ज.राजेंद्र निंभोरकर, ज्येष्ठ उद्योजक जगदीश कदम, सुप्रसिद्ध उद्योजक विनायक बापट सुप्रसिद्ध गायक ईकबाल दरबार,मेलडी मेकर्स चे अशोक सराफ आणि पुण्यातील गायन आणि वादन क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळींनी विचारलेल्या प्रश्नांना आनंदजींनी याप्रसंगी दिलखुलास उत्तरे देऊन मैफिल गाजवली. सुप्रसिद्ध गायक राजेश टंडन यांनी याप्रसंगी आनंदजींच्या स्वर यात्रेबद्दल माहित नसलेल्या गोष्टी विशद केल्या. आनंदजी यांचे कुटुंबीय सुद्धा या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
अखेरच्या क्षणापर्यंत संगीतसेवा करीत राहणार असे प्रतिपादन आनंद जी यांनी करताच पुणेकरांनी त्यांना उभे राहुन मानवंदना दिली.
आपला नम्र
अशोक दोरुगडे
९८२२०९७५५५

Spread the love