Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

पुणे शहरातील मनपा सफाई कर्मचारी हे स्वच्छतेचे देवदूतच -प्रशांतदादा जगताप


१२/७/२०२१ सोमवार,पुणे : मा.खा.सुप्रियाताई सुळेमा. खा.वंदनाताई चव्हाण यांच्या वाढदिवसानिमीत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,कसबा विधानसभा मतदार संघ युवती अध्यक्षा अबोली हेमंत सुपेकर यांनी सफाई कर्मचारी महिला व पुरूष यांचा सत्कार केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणेशहर अध्यक्ष मा.प्रशांतदादा जगताप हे प्रमुख पाहुणे म्हणून या वेळेस उपस्थित होते .महिला कर्मचारी यांना साडी चोळी तर पुरुषांना टॉवेल व रुमाल देऊन सन्मानित करण्यात आले.
“या कोरोना महामारी च्या भीषण काळात सर्वजण घरात बसून काळजी घेत होते परंतु हे सफाई कर्मचारी घरा बाहर पडुन समाजाच्या स्वच्छतेची काळजी घेत होते.

सर्व युवक व युवती वर्गाने असेच कार्यरत राहून सामाजिक भान जपले पाहिजे. पण कार्य करताना काही अडचणी आल्यास आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाके पदाधिकारी व साहेब आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत तसेच कसबा मतदार संघातील युवतींनी पुढे येऊन कार्यरत व्हावे.

इथून पुढे आम्ही 5 वर्षांनी अबोली व तिच्या सारख्या अजुन युवा पीढीला सभागृहत पाहतो आहोत ” असे मत जगताप यांनी मांडले व असा स्तुत्य उपक्रम राबवल्या बद्दलकार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

त्याच प्रमाणे या कार्यक्रमात पुणेशहर युवक अध्यक्ष मा.महेश हांडे यांच्या वाढदिवस साजरा करुन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

या वेळेस प्रदेश प्रवक्ते मा.रवींद्रअण्णा माळवदकर,पुणेशहर महिलाध्यक्ष मा. मृणालिनी वाणी, पुणेशहर युवती अध्यक्षा मा.अश्विनी परेरा, पुणेशहर युवक अध्यक्ष मा.महेश हांडे कसबा विधानस अध्यक्ष मा.विनायक दादा हनमघर,कार्याध्यक्षय मा.गणेश नलावडे,शिवाजीनगर चे मा.दयानंद इरकल ,कसबा विधानसभा चे सर्व पदाधिकारी व सर्व पुणे शहर युवती व महिला उपस्थित होते.

पूना होस्पिटल जवळ,सदाशिव पेठेत सदर कार्यक्रम पार पडला.

Spread the love