Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे राखीपोर्णिमा साजरी,अमित बागुल

बंध नात्याचे, वचन रक्षणाचे
अंतर्गत विविध उपक्रम

बंध नात्याचे, वचन रक्षणाचे या उपक्रमांतर्गत समाजासाठी अहोरात्र काम करणारे,देशासाठी आपल्या जीवाची पर्वा न करणारे,नात्यांपासून वंचित असणाऱ्या बंधू व भगिनींसोबत पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे मा आबा बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सरचिटणीस अमित बागुल यांच्या तर्फे राखीपोर्णिमेनिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले.

त्यामध्ये पोलीस बांधवांना रक्षण राखी, झाडांना वृक्षवल्ली राखी,दुर्धर आजाराने ग्रस्त मुलींसोबत राखी आरोग्य राखी, युद्धामध्ये जायबंदी झालेले पॅरापँजिकल सेंटर मधील सैनिक तसेच प्रभागातील महिला भगिनींसोबत राखी हे उपक्रम गेल्या दहा वर्षांपासून आयोजित करीत असून यंदाच्या वर्षीही भारतीय लष्करातील जवान आपल्या प्राणाची तमा न बाळगता, आपली सुख दुःख, कोणतेही सण साजरे न करता भारतीय सीमांचे रक्षण करतात,सर्व भारतीयांना आपल्या कार्याचा सार्थ अभिमान आहे हा विश्वास देण्यासाठी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागरिकांना या उपक्रमात सहभागी होऊन राख्या तयार करून आपल्या सैनिकांप्रती असलेल्या भावना व्यक्त करून आमचे कार्यालयात जमा करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

पुणे शहराच्या विविध भागातून नागरिक, शाळा व संस्था या विशेष उपक्रमात सहभागी झाले असून त्यांनी दिलेल्या या सर्व राख्या भारतीय जवानांना देण्यात आल्या तसेच दत्तवाडी पोलीस स्टेशन मधील पोलीस बांधवांसोबत,खडकी येथील पॅरापॅजीकल सेंटर येथील जायबंदी झालेल्या भारतीय जवानांसोबत,गुजरवाडी कात्रज येथील ममता फाउंडेशन मधील एड्सग्रस्तमुलींसोबत राखी बांधून रक्षाबंधन साजरा करण्यात आले.

त्याच बरोबर वृक्ष वल्ली आपल्या निसर्ग जोपासण्यासाठी दरवर्षी झाडांना राख्या बांधण्यात येतात आणि आपण आपले निसर्ग संवर्धनासाठी कटिबद्ध आहोत याची शपथ या ठिकाणी घेण्यात आली.

अमित बागुल म्हणाले की, गेल्या 10 वर्षांपासून या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असून आपली सुख दुःख बाजूला ठेऊन केवळ समाजासाठी काम करणाऱ्यांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

आपल्या सोबत समाज सदैव आहे. हा संदेश देण्यात येतो.

यावेळी ,महेश ढवळे, इम्तियाझ तांबोळी,धनंजयकांबळे ,बाबालाल पोळके, सागर आरोळे, सुरेश गायकवाड, ओंकार उपाध्ये, सुरज सोनवणे, सौरभ ढेबे, गौरव साळवे, अमोल पोतदार, राहुल तौर, अभिषेक बागुल, ताई कसबे, नंदा साखरेआदी उपस्थित

जाहिरात / प्रसिद्धिसाठी
संपर्क: शिवाजी मा. हुलवळे
संपादक: छत्रपती मिडीया ग्रुप ✒️
पत्रकार – छायाचित्रकार
9422306342 / 8087990343

Spread the love