Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

Pune BJP MP Girish Bapat Death

Pune BJP MP Girish Bapat Death | पुणे लोकसभा मतदार संघाचे खासदार गिरीश बापट (Pune BJP MP Girish Bapat Death) यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शासनाच्यावतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) , माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar), खासदार श्रीरंग बारणे (MP Shrirang Barne), आमदार उमा खापरे (MLA Uma Khapre), सुनील कांबळे (MLA Sunil Kamble), भीमराव तापकीर (MLA Bhimrao Tapkir), सिद्धार्थ शिरोळे (MLA Siddharth Shirole), अशोक पवार (MLA Ashok Pawar), माधुरी मिसाळ (MLA Madhuri Misal), रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar), राहुल कुल (MLA Rahul Kul), श्रीकांत भारतीय (Shrikant Bharatiya) यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. (Pune BJP MP Girish Bapat Death)

यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आपल्या कुटुंबातले घटक, अजातशत्रू खासदार गिरीश बापट सोडून गेले याचे सर्वांच्या मनात प्रचंड दुःख आहे. ते सर्वसामान्यांचे नेते होते. सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला आपला माणूस वाटत होते. अनेक आंदोलनातून त्यांचे नेतृत्व उभे राहिले. नगरसेवक, महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष, पाचवेळा विधानसभेवर आमदार आणि त्यानंतर लोकसभेत पुण्याचे प्रतिनिधित्व केले.

स्व. बापट यांनी २०१४ ते २०१९ दरम्यान मंत्री म्हणून काम केले. त्यांनी आपली कारकीर्द, प्रत्येक भूमिका प्रचंड यशस्वी केली. अजातशत्रू अशा व्यवहारामुळे विधानमंडळ चांगला कारभार चालवला. नागरी पुरवठा मंत्री म्हणून पहिल्यांदा राज्यात संपूर्ण रेशन कार्डांचे आधार जोडणी करून १ कोटी बोगस रेशन कार्ड शोधून काढले आणि नवीन १ कोटी गरिबांना रेशन देण्याचे काम केले. त्यांच्या जीवनाच्या पानाशिवाय पुण्याचा इतिहास पुढे जाऊ शकणार नाही. तब्येत खराब असतानाही त्यांनी लढाई कधीच सोडली नाही, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

संपूर्ण शासकीय इतमामात स्व. बापट यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. पोलीस दलातर्फे त्यांना शोकप्रसंगीचे बिगूल वाजवून आणि बंदूकीच्या तीन फैरी झाडून सशस्त्र मानवंदना देण्यात आली. पार्थिवावर लपेटण्यात आलेला राष्ट्रध्वज स्व. बापट यांचे सुपुत्र गौरव बापट यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

यावेळी पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Ritesh Kumar), मनपा आयुक्त विक्रम कुमार
(IAS Vikram Kumar) आणि लोकसभा अध्यक्ष यांच्यावतीने जिल्हाधिकारी
डॉ.राजेश देशमुख (Dr Rajesh Deshmukh) यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली.
स्व. बापट यांना श्रद्धांजली देण्यासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil), माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे (Former Minster Dilip Kamle),
विजय शिवतारे (Vijay Shivtare), रमेश बागवे (Ramesh Bagwe),
माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakade), अमर साबळे (Amar Sabale),
माजी आमदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni), योगेश टिळेकर (Yogesh Tilekar),
चंद्रकांत मोकाटे (Chandrakant Mokate), मोहन जोशी (Mohan Joshi),
उल्हास जोशी, नरेंद्र पवार, शरद ढमाले, आशिष देशमुख यांच्यासह राजकीय,
सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील नागरीक उपस्थित होते.

गिरीश बापट अल्प परिचय. जन्म – 3 सप्टेंबर 1950
प्राथमिक शिक्षण – तळेगाव दाभाडे
माध्यमिक शिक्षण – न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग
महाविद्यालयीन शिक्षण (बी. कॉम.) – बीएमसीसी
1973 मध्ये टेल्कोमध्ये कामगार म्हणून रूजू
आणीबाणीत नाशिक जेलमध्ये 19 महिन्यांचा कारावास
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि परिवारातील संस्थांची विविध पदांची जबाबदारी
1983 मध्ये पहिल्यांदा नगरसेवक
सलग तीनवेळा नगरसेवक
सत्ता नसतानाही महापालिकेत स्थायी समितीचे अध्यक्ष
1995 पासून सलग पाचवेळा कसब्याचे आमदार
देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री
2019 मध्ये पुण्याचे खासदार

Spread the love