Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

भिमाशंकर प्रिमियर लीग(बीपीएल) या क्रिकेट व फुटबॉल स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ

भिमाशंकर प्रिमियर लीग(बीपीएल) या क्रिकेट व फुटबॉल स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मा.नगरसेवक तथा सभागृह नेते श्री.रविंद्र इथापे यांच्या शुभहस्ते पार पडला.

यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून भिमाशंकरचे चेअरमन रमेश पवार, खजिनदार संजय चव्हाण,संचालक रंगराव पाटील,संचालक रवि डेरे,संचालक केशवकाका नलावडे,संचालक रमेश जाधव,संतोष पाडेकर,उत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रदीप दांगट, राजेंद्र खिलारी,आयोजक जयदीप भोसले,रोहित नलावडे,प्रणित डोंगरे,विपुल थोरात,प्रतिक नाईकरे,संकेत निकम,सुरज फडतरे व इतर खेळाडू उपस्थित होते.

याप्रसंगी क्रिकेटचा विजेता संघ बनी बाॅईजला रू.२००००/- व स्मृतिचिन्ह,उपविजेता संघ अल्टीमेट वारियर्सला रू.१००००/-व स्मृतिचिन्ह तसेच फुटबॉलमध्ये विजेता मॅनसिटी संघ व उपविजेत्या डाॅर्टमन्ड संघास पारितोषिक व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

Spread the love