Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

पूरग्रस्तांसाठी भाजपचे मदत संकलन सुरू

कोकणातील पूरग्रस्तांसाठी भाजपा पुणे शहराच्या वतीने मदत साहित्य एकत्र करून पाठविण्याची मोहीम आजपासून सुरू झाली.

शहराध्यक्ष मा. जगदीशजी मुळीक यांच्या नेतृत्त्वाखाली आणि माझ्या संयोजकत्त्वाखाली शहरातील पक्ष कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकारी- नगरसेवकांच्या माध्यमातून ही मदत एकत्र केली जात आहे.

कसबा मतदारसंघातील नगरसेविका सौ. सुलोचनाताई कोंढरे आणि श्री. तेजेंद्र कोंढरे यांच्या वतीने आज पहिली मदत पूरग्रस्तांना पाठविण्यासाठी आमच्याकडे सुपूर्त करण्यात आली.

२५० ब्लॅंकेट, २५० चटया, ५० ताडपत्री, १०० साड्या, ५० ड्रेस मटेरियल, ५० लहान मुलांचे कपडे, ३००० बिस्कीट पुडे, १०० गृहोपयोगी भांडी, १५० बाॅक्स पाणी बाॅटल्स या वस्तूंचा या ट्रकमध्ये समावेश आहे.

कसबा मतदारसंघाच्या आमदार सौ. मुक्ताताई टिळक, स्थायी समिती अध्यक्ष मा. हेमंतजी रासने, पुणे शहर भाजपा सरचिटणीस गणेशजी घोष, भाजयुमो शहराध्यक्ष राघवेंद्रजी मानकर, शहर उपाध्यक्षा स्वरदाताई बापट, कसबा मंडल अध्यक्ष प्रमोदजी कोंढरे, सरचिटणीस राणीताई कांबळे, छगनजी बुलाखे, राजेंद्रजी काकडे, युवा अध्यक्ष अमितजी कंक, शहर कार्यालय मंत्री संजयमामा देशमुख, सहप्रवक्ता पुष्करजी तुळजापूरकर यांच्यासह मान्यवर व कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

जागतिक ते स्थानिक पातळीपर्यंत ग्लोबल वार्मिंगपासून पर्यावरणाच्या अनेक समस्यांचा आपल्याला सामना करावा लागतो आहे.

दोन महिन्याच्या पाऊस दोन चार दिवसांत कोसळून सर्वत्र हानी सुरू आहे. याचाच परिणाम आपण सहन करीत आहोत.

ज्या ज्या ठिकाणी अशा दुर्घटना घडत आहेत तेथे कर्तव्य म्हणून मदतीसाठी धावून जाणे हे आपले कर्तव्य आहे.

भारतीय जनता पक्ष लोकांच्या संकटात नेहमीच मदतीसाठी अग्रेसर आहे. पुणे शहरातून याचाच भाग म्हणून मा. जगदीशजी मुळीक यांच्या नेतृत्वाखाली हे मदतीचे काम सुरू करण्यात आले आहे.

विरोधी पक्षनेते मा. देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील, खासदार मा. गिरीशभाऊ बापट आणि सर्व प्रमुख नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी या कामात जोडले गेले आहेत.

पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत विविध टप्प्यांमध्ये करण्याचे आमचे नियोजन आहे, अशी माहिती मी यावेळी भाजपच्या पूरग्रस्त मदत कक्षाचा समन्वयक म्हणून उपस्थितांना दिली.

जाहिरात / प्रसिद्धिसाठी
संपर्क: शिवाजी मा. हुलवळे
संपादक: छत्रपती मिडीया ग्रुप ✒️
पत्रकार – छायाचित्रकार
9422306342 / 8087990343

Spread the love