Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सभागृहात अद्ययावत जैवतंत्रज्ञानावर आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न

पिंपरी ता.17 डिसेबर -डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे आणि डीपीयू फाऊंडेशन फॉर इनोव्हेशन इन्क्युबेशन अँड एंटरप्रेन्योरशिप (डीपीयू एफआयआयई) यांच्या संयुक्त विद्यमाने अद्ययावत जैवतंत्रज्ञानावर आधारित आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सभागृहात ही एक दिवसीय परिषद उत्साहात संपन्न झाली.

जगभरातून नामांकित संशोधकांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. भारतीय फार्मा आणि बायोटेक उद्योगांच्या गरजा व विकासात्मक दृष्टिकोन आणि विद्यार्थ्यांमध्ये बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, संशोधन तसेच व्याप्ती वाढावी या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

परिषदेच्या उद्घाटन समारंभासाठी व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राजेश गोखले, सचिव, जैवतंत्रज्ञान विभाग, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली, तसेच डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्र-कुलपती डॉ. भाग्यश्रीताई पाटील, विश्वस्त व कार्यकारी संचालिका डॉ. स्मिता जाधव यांच्या उपस्थितीत या परिषदेला सुरुवात झाली.

“सध्या भारतात बायोटेक्नॉलॉजी या क्षेत्रामध्ये संशोधनात अमुलाग्र बदल होत आहेत ही सकारात्मक बाब आहे. विज्ञान व समाज हे एकमेकांमध्ये गुंतलेले असून एकमेकांसाठी पूरक आहेत. नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान राष्ट्रीय स्तरावर धोरणात्मक पद्धतीने पुढे येत आहे. संशोधन हे जागतिक स्तरावर महत्त्वाचे साधन बनलेले आहे तरी विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण जैव तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनामध्ये पुढाकार घ्यावा” असे मत डॉ राजेश गोखले यांनी उद्घाटन पर भाषणात विद्यार्थ्यांना संबोधित केले.

या परिषदेतसाठी सुमारे ३२ आंतरराष्ट्रीय संशोधकांनी सहभाग घेतला आठशेहून अधिक विद्यार्थी व प्राध्यापकांनी उपस्थिती लावली यामध्ये बायोटेक्नॉलॉजी वैद्यकीय विद्याशाखेतील विद्यार्थी परिषदेत सहभागी होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ स्वरदा पिरान्नेवार यांनी केले तर सत्राची सुरुवात डॉ. जे के पाल यांनी केली. परिषदेतील विविध संशोधकांची ओळख डॉ निलू नवानी यांनी केली प्रथम सत्र बायोटेक उद्योगातील प्राथमिक क्षेत्रातील संधी व व्याप्ती यावर डॉ. ज्योती कोडे, डॉ जयश्री अय्यर, डॉ सुरेंद्र चव्हाण, डॉ रवींद्र खरे यांनी आपले संशोधनापर मनोगत व्यक्त केले.

दुपारच्या चर्चासत्रामध्ये संशोधकांची ओळख डॉ लक्ष्मी शेट्टी यांनी करून दिली हे सत्र भारतातील संधींची व्याख्या आणि प्राधान्य व आरोग्य तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाचे संबंध तसेच गोल्बल हेल्थ केअर सिस्टीमवर प्रभाव टाकणारी भारतीय औषधे आणि बायोटेक या विषयांवर चर्चा झाली त्यामध्ये प्रमुख संशोधक डॉ. अरिदनी शहा, डॉ. ज्ञानेश्वर यादव, डॉ. सौरभ महाजन, डॉ. तनय भट, डॉ. विहंग घळसासी, शमा भट, ज्यूड स्टीफन, कु. अर्पिता रामचंद्रैया यांनी भाग घेतला व डॉ. नरेंद्र चिरमुले यांनी या चर्चा सत्राचे मूल्यमापन केले.

तिसऱ्या चर्चा सत्राची ओळख डॉ सुप्रिया खेऊर यांनी केली तर हे चर्चा सत्र धोरणांची अंमलबजावणी कशी करावी याअनुषन्गाने डॉ. महेश लच्यणकर, डॉ. सुप्रीत देशपांडे, डॉ. प्रणोती मांढरेकर, डॉ. श्रीनिवासन कृष्णा यांनी संबोधित केले.

सायंकाळच्या चौथ्या सत्रात फार्मा उद्योग क्षेत्रातील ध्येयधोरणे व जैवतंत्रज्ञानातील विकासासाठी उद्योग शैक्षणिक भागीदारी आणि प्रायोजकत्व या विषयावर डॉ. मुरली रामचंद्र, डॉ. अरविंद चारी, डॉ जे के पाल यांनी आपले संशोधनात्मक विचार मांडले व डॉ रत्नेश जैन यांनी या चर्चा सत्राचे मूल्यमापन केले.

Spread the love